श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात गुरूवारी रात्री सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. हा दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचा असल्याचे समजते.
भारतीय जवानांना बिजबेहरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर घेराव घालून जवानांनी शोध मोहिम सुरू केली होती. अशात दशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला होता.
चकमकीत ठार झालेल्या यावरने पोलिसांकडून रायफल पळवली होती. ती हस्तगत करण्यात आली आहे. मध्यरात्रीचा फायदा उठवून या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना एका दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले. यात हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये नुकताच भरती झालेला दहशतवादी मारला गेला. यावर असं या दहशतवाद्याचं नाव आहे. तो अनंतनाग येथील असल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली. जवळपास दोन तास चकमक सुरू होती.
J&K: Terrorist killed in an encounter with security forces in Anantnag district
— ANI (@ANI_news) August 3, 2017
अंधाराचा फायदा घेत इतर दोन दहशतवादी पसार झाले आहेत. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे. मात्र, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली. चकमकीत ठार झालेल्या यावरने पोलिसांकडून रायफल पळवली होती. ती हस्तगत करण्यात आली आहे. तसंच चायनिज हॅँडग्रेनेडही जप्त करण्यात आले आहेत.