पुलवामात हिजबुलच्या कमांडरसहित 2 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये दोन आणखी अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.

Updated: May 18, 2019, 10:48 AM IST
पुलवामात हिजबुलच्या कमांडरसहित 2 दहशतवादी ठार  title=

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दोन आणखी अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा आणि अनंतनागमध्ये सुरक्षा रक्षक आणि अतिरेक्यांमध्ये ही चकमक झाली. पुलवामात झालेल्या चकमकीत हिज्बुलचा कमांडर शौकत डार मारला गेला आहे. शौकत डार जवान औरंगजेब यांच्या हत्येत सामील होता. 

पुलवामाच्या पंजगाममध्ये काल रात्री चकमक झाली. याठिकाणी दोन ते तीन अतिरेकी लपले असण्याची बातमी मिळाली होती. तर अनंतनागच्या देहरुना गावात सकाळी चकमक सुरू झाली. गेल्या दोन दिवसांत सुरक्षा रक्षकांनी आठ अतिरेक्यांना कंठस्नान घातलंय. काल शोपियानमध्ये ३ आणि पुलवामात ३ अतिरेक्यांना मारण्यात यश आलं. कालच्या चकमकीत दोन जवान देखील शहीद झाले.