पुलवामा एन्काऊंटरमध्ये १२ लाखांचे बक्षीस असलेला दहशतवादी रियाज ठार

रियाजसाठी १२ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. 

Updated: May 6, 2020, 04:16 PM IST
पुलवामा एन्काऊंटरमध्ये १२ लाखांचे बक्षीस असलेला दहशतवादी रियाज ठार title=

नवी दिल्ली : पुलवामा दरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे.  हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाज नाईकू एनकाउंटरमध्ये मारला गेला आहे. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर दहशतवादी संघटनेने रियाज नायकू याला आपला कमांडर बनवले होते. तेव्हापासून तो भारतीय सैन्याच्या रडारवर होताच. रियाजसाठी १२ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. 

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी सुरु आहेत. त्यातील एका ठिकाणी सुरक्षा दलाच्या निशाण्याने एका दहशतवाद्याला ठार मारले. 

दुसऱ्या ठिकाणी सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी रियाझ नायकूचा शोध घेण्यास सुरुवात केली. यासाठी परिसराला घेराव घालण्यात आला. या दरम्यान रियाज नायकू एन्काऊंटरमध्ये मारला गेल्याचे वृत्त आले 
यावरील अधिकृत माहिती येणं बाकी आहे.