ठाकरे सरकार संकटात! राज्याचं राजकारण तापलं; दिल्लीत हालचालींना वेग

शिवसेनेचे महत्वाचे मंत्री आणि नेते एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत मोठी फूट पडू शकते परिणामी ठाकरे सरकारलाही धोका निर्माण होऊ शकतो. 

Updated: Jun 21, 2022, 12:37 PM IST
ठाकरे सरकार संकटात! राज्याचं राजकारण तापलं; दिल्लीत हालचालींना वेग title=

नवी दिल्ली : शिवसेनेचे महत्वाचे मंत्री आणि नेते एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत मोठी फूट पडू शकते परिणामी ठाकरे सरकारलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींकडे आता सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. 

राज्यातील राजकीय घडामोडींबाबत दिल्लीतही मोठ्या हालचाली घडत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट झाली. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातूनही देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहचले असल्याची माहिती मिळतेय.  म्हणजेच महाराष्ट्रातील घडामोडींचा परिणाम दिल्लीतही दिसून आला. लवकरच महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करीत म्हटले की, शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता...

राणेंच्या या ट्विटमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. आनंद दिघे हे शिवसेनेचे ठाण्यातील मोठे नेते होते. राणे नक्की असे का म्हटले याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत.