Transformation Journey: नवऱ्याने सोडले, नोकरी गेली! मेहनतीच्या जोरावर पटकावला अमेरिकेत सौंदर्याचा किताब

Success Story: आयुष्याचा पराजय स्वीकारुन प्रिया देखील शांत बसू शकत होती पण तिला आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांसाठी स्वप्नांचा त्याग करायचा नव्हता.

Updated: Sep 11, 2022, 05:40 PM IST
Transformation Journey: नवऱ्याने सोडले, नोकरी गेली! मेहनतीच्या जोरावर पटकावला अमेरिकेत सौंदर्याचा किताब  title=

Transformation Journey: आपल्या सगळ्यांचे लहानपणापासून काही काही न काहीतरी स्वप्ने असतात. कोणाला डॉक्टर व्हायचे असते, कोणाला इंजिनियर व्हायचे असते, कोणाला आर्टीस्ट व्हायचे असते तर कोणाला पोलीस ऑफिसर. या स्वप्नांचा आपण तेव्हा विचार करतो जेव्हा आपण शाळेत जात असतो. पण जस जसे आपण मोठे होत जातो तस तसे आपल्या आवडी निवडी बदलत जातात. मग आपण या स्वप्नांचा विचार न करता दुसऱ्या फिल्ड चा विचार करु लागतो पण काही जण असे असतात की उशिरा का होईना जिद्द आणि मेहनतीने आपली स्वप्न पुर्ण करतात. अशाच एका महिलेने बालपणी ब्युटी क्वीन व्हायचे स्वप्न पाहिले होते पण लवकर लग्न झाल्यामुळे आणि रुढी-परंपरा या विचारांचे सासर मिळाल्यामुळे ते स्वप्न फक्त स्वप्नचं राहिले. उशिरा का होईना तिने ते स्वप्न पुर्ण करुन इतर महिलांसाठी उदाहरण तयार केले. अमेरीकेत नुकत्याच पार पडलेल्या एम एस वर्ल्ड इंटरनेशनल एंबेसेडर 2022 (Ms World International Ambassador 2022) ही स्पर्धा जिंकुन तिने तिचे बालपणाचे स्वप्न पुर्ण केले. ही महिला नक्की आहे तरी कोण? जर ही महिला जाणुन घ्यायची असल्यास खालील बातमी पुर्ण वाचा. तिची Transformation Journey वाचून तुम्ही नक्कीच Motivate व्हाल. 

आयटी कंपनीत जॉब 
एम एस वर्ल्ड इंटरनेशनल एंबेसेडर 2022 (Ms World International Ambassador 2022) ही स्पर्धा जिकंणाऱ्या महिलेचे नाव प्रिया परमिता पॉल (Priya Paramita Paul). भारतीय वंशाची असुन ती मुळात असममध्ये राहणारी आहे. प्रिया हल्ली मुंबईला राहतात आणि एका आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आणि लाईफ कोच म्हणुन काम करतात. एम एस वर्ल्ड इंटरनेशनल एंबेसेडर 2022 (Ms World International Ambassador 2022) चे फायनल फ्लोरिडामधील (अमेरिका) मियामी इथे झालं. या स्पर्धेत एकूण 72 प्रतिस्पर्धी सहभागी झाले. जेव्हा फायनल राऊंड नतंर निकाल घोषित करण्यात आला तेव्हा बॅच नंबर 59, भारताचे नाव घोषित करण्यात आले माझा आनंद द्विगणीत झाला मी इतकी खुश झाले कारण मी तिथे भारताचे प्रतिनिधीत्व करत होते. ते टायटल जिंकल्यानतंर प्रिया जागतिक ईवेंट, चैरिटी प्रोग्राम आणि इतर प्रकल्पांमध्ये ग्लोबल एंबेसेडर म्हणुन सहभागी होणार. यासोबतच मला मिस वर्ल्ड इंटरनॅशनल, मिसेस वर्ल्ड इंटरनॅशनल, मिस वर्ल्ड पेटिट या खिताबही मिळाले आहेत. 

प्रियाने तिच्या आयुष्यात खुप चढ-उतार पाहिले आहेत. आणि याच कारणांमुळे मी आज या स्टेजवर आहे. आयुष्याचा पराजय स्वीकारुन प्रिया देखील शांत बसू शकत होती पण तिला आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांसाठी स्वप्नांचा त्याग करायचा नव्हता. तिची स्वप्ने आहेत आणि ती पुर्ण करणार हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून तिने ते पुर्ण करुन दाखवले. इतक्या वर्षांपासून जे स्वप्न पुर्ण करता आले नाही ते स्वप्न आता पुर्ण करण्यात यश आले. पण हे स्वप्न पुर्ण करता करता खुप अडचणी देखील आल्या तर जाणुन घेऊ त्या अडचणी. 

नोकरी सुटली, नवऱ्याने सोडले
2016 मध्ये प्रियाचे लग्न झाले. सासू, सासरे, नवरा आणि 2 दीर एकाच घरात सगळे खुप आंनदात राहत होते. काही काळानंतर ती आणि तिचा नवरा वेगळे राहायला गेले. काही वेळेने तिच्या नवऱ्याने तिला ईमेल मध्ये सांगितले की "मी तुझ्यासोबत राहु शकत नाही, मी जात आहे." हा मेल पाहुन प्रिया घाबरली आणि तिने लगेचच तिच्या नवऱ्याला कॉल केला SMS केले पण कोणत्याही प्रकारचा  प्रतिसाद नाही मिळाला. काही वेळेनतंर असे समजले की तिच्या नवऱ्याचे एक्स्ट्रा मैरिटल अफेयर होते या करणात्सव त्याने प्रियाला सोडले. प्रिया ने 2 वर्ष तिचा संसार एकत्र सुरु करावा यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. पण त्यावर तिच्या नवऱ्याचा कोणताही प्रतिसाद नाही मिळाला शेवटी 2018 ला डिवोर्स घेत ती त्या बंधनातून मुक्त झाली. या सगळ्या प्रकाराने तिला नैराश्य आलं त्याचा प्रभाव तिच्या कामावर होऊ लागला त्यामुळे तिची नोकरीसुद्धा गेली. यामुळे तिची आर्थिक गणिते बिघडली. घरचा ईएमआय आणि बाकी खर्चाचे ओझं तिच्यावर आलं.

स्वत:वर केलेल्या प्रेमामुळे वाढला आत्मविश्वास 
परंपरा आणि जुन्या विचारांचे सासर मिळाल्याने माझे स्वप्नं मी मागे सोडले. पण जेव्हा अशा अडचणींना सामोरे गेल्यावर मी स्वत:वर काम करायला सुरुवात केली आणि मागे सोडलेल्या स्वप्नांवर मेहनत घेतली. यादरम्यान तिने तिचे 10 ते 12 किलो वजन कमी केले, ज्यामुळे तिच्या आत्मविश्वासात वाढ झाली. सेल्फ हिलिंग, योगा, जिम, रनिंग इत्यादींचा आधार घेतला, ज्यामुळे तिला मानसिक आराम मिळण्यास मदत झाली. व्यक्तिमत्व विकास आणि वजन कमी केल्यानंतर, तिचा आत्मविश्वास उंचावला गेला आणि ती खूप मजबूत आणि धाडसी बनली होती. आणि तिने तिचा प्रवास असाच सुरू ठेवला.

स्वपने सगळेच पाहतात पण त्या स्वप्नांना गांभीर्याने घेऊन पुर्ण करणारी लोकं मात्र कमी आहेत. आणि या कमी लोकांमध्येच  प्रिया परमिता पॉल (Priya Paramita Paul) या नावाचा देखील समावेश आहे. तर ही Inspirational आणि Motivational Story याबाबत तुम्हाला काय वाटतं, कृपया कमेंटमध्ये कळवा. 

 

: हा फोटो ट्विटरवरुन घेतला आहे.