लसीचा तुटवडा या महिन्यापर्यंत जाणवेल; आदर पुनावालांचे स्पष्टीकरण

कोविशिल्ड लसीचे उत्पादन या महिन्यार्यंत वाढविण्याचा अंदाज आदर पुनावाला यांनी व्यक्त केला आहे.

Updated: May 3, 2021, 10:22 AM IST
लसीचा तुटवडा या महिन्यापर्यंत जाणवेल; आदर पुनावालांचे स्पष्टीकरण title=

मुंबई : देशात कोरोना विषाणूने भयावह स्थिती तयार केली आहे. जानेवारी फेब्रुवारीत कमी झालेला विषाणूने पुन्हा रौद्र रुप धारण केले आहे. कोरोना विरोधातील लढाईत लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. अनेक जिल्ह्यात राज्यांमध्ये लसीचा मोठा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे.

जुलैपर्यंत राहणार लसीचा तुटवडा
कोरोना रोखण्यासाठी देशातील तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण खुले करण्यात आले आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाची गती कमी केली आहे. याच दरम्यान ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाची लस कोविडशिल्डची निर्मिती करणारी सीरम इंन्स्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी मोठा खुलासा केला आहे. जुलैपर्यंत देशात लसीचा तुटवडा असेल असं त्यांनी म्हटलं आहे.

एका इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील लसीकरणाची गरज भागवण्यासाठी 60 ते 70 मिलियन डोसेस पासून ते 100 मिलियन डोसेची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी जुलैपर्यंतचा वेळ जाऊ शकतो. सरकारने 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण खुले केल्याने लसींचा तुटवडा भासत आहे. असे पुनावाला यांनी म्हटले आहे.