नवी दिल्ली : दिग्गज भारतीय ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स (TATA MOTORS)या सणासुदीच्या दिवसामध्ये Micro SUV TATA Punch लॉंच करण्याच्या तयारीत आहे. टाटा पंच लॉंच होण्याच्या आधी बऱ्याच ठिकाणी स्पॉट करण्यात आली आहे. टाटाच्या H2X कॉन्सप्टवर आधारित पंचला डीलरशीपवर पाठवणे सुरू केले आहे. या कारची सर्वात विशेष बाब म्हणजे भारतात ही कार 6 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीत लॉंच केले जाऊ शकते.
कमी किंमतीत प्रीमियम फीचर्स
TATA Punch पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात 5 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीत लॉंच केली जाऊ शकते. टाटा मोटर्सने नुकतेच त्याचे टीझर जारी केले आहे. ज्यामध्ये डिझाईन सोबतच अनेक फीचर्सचा खुलासा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टाटा पंचमध्ये मल्टीपल रायडिंग मोड्स उपलब्ध आहेत. जे स्वस्त कारांमध्ये दिसून येत नाही. पंचकडे ग्राहकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी या मायक्रो SUV वेगवेगळे फीचर्स घेऊन येत आहे. जे फीचर्स क्रोटा, सेल्टॉस आणि ब्रेझासोबतच दिसतात.
3 शानदार रायडिंग मोड्स
कारचा फ्रंट लूक बऱ्याच प्रमाणात टाटा सफारी आणि टाटा हैरिअरशी मिळता जुळता आहे. टाटा पंच टाटा नेक्सॉन सारखी स्पोर्ट, सीटी आणि इको रायडिंग मोड्स आहेत. टाटा पंच दोन इंजिनच्या पर्यायात उपलब्ध होऊ शकते. जी 1.2 लीटर 3 नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल युनिट असतील. पंचला 5 स्पिड मॅन्युअल आणि AMT ट्रान्समिशन ऑप्शन सोबतच लॉंच केले जाऊ शकते.