व्वा! दोघींसोबत 4 वर्ष रिलेशनमध्ये, घरच्यांनी दोघींशी लग्न लावलं

विशेष म्हणजे तिघांच्या कुटुंबियांनी यावर हरकत घेतली नाही.

Updated: Jun 18, 2021, 09:57 PM IST
 व्वा! दोघींसोबत 4 वर्ष रिलेशनमध्ये, घरच्यांनी दोघींशी लग्न लावलं title=

तेलंगाणा :  प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. कधी कोणाचा कसा जीव जडेल काही सांगता येत नाही. काही आपल्या प्रेयसी/प्रियकरासोबत प्रामाणिक राहतात. तर काही जणं गुपचूप प्रियकर/प्रेयसीच्या नकळत दुसऱ्यासोबतही रिलेशनमध्ये असतात. असंच एका पठ्ठ्याचं दोन तरुणींवर जीव जडला होता. (The young man was in love with two girls for the last four years the family members married both of them with pomp)

पठ्ठया 4 वर्षांपासून दोन्ही प्रेयसींसोबत रिलेशनमध्ये होता. विशेष म्हणजे या दोन्ही मुलींना या प्रकरणाबाबत माहिती होती. यानंतरही या दोघींनी एकासोबतच आनंदाने लग्न केलं. विशेष म्हणजे हे लग्न तिघांच्या कुटुंबियांच्या संमतीने पार पडलं.

हा सर्व प्रकार आहे तेलंगाणातील आहे. या दोन्ही वधूंचं नावं सुरेखा आणि उषाराणी असल्याचं सांगण्यात येत आहे. तर अर्जुन वराचं नाव आहे. सुरेखा आणि उषाराणी गेल्या 4 वर्षांपासून अर्जूनसोबत रिलेशनमध्ये होत्या. या दोघींनी एकमेकांबाबत माहिती होती. पण या दोघींनाही याबाबत काहीच आक्षेप नव्हता. मग काय तिघांनी आपसात लग्न करायचं ठरवलं. 

विशेष म्हणजे तिघांच्या कुटुंबियांनी यावर हरकत घेतली नाही. तिघांच्याही कुटुंबियांनी या विवाहाला परवानगी दिली. गावकऱ्यांच्या उपस्थितीत अगदी थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जून हा पदवीधर आहे. तर सुरेखा आणि उषाराणी या दोघीही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. 

संबंधित बातम्या : 

खाद्यतेलांवरील आयात शुल्क सरकार कमी करणार नाही, का घेतला हा निर्णय?

Corona Vaccination: लसीकरण नोंदणी आता आणखी सोपी, CoWIN शी जोडले गेले 91 App आणि पोर्टल