Gold Price | सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; खरेदीची संधी चुकवू नका

 सोने खरेदी करण्याची चांगली संधी आली आहे. आज सोने 46,870 रुपये प्रति तोळे इतके झाले आहे. सोन्याच्या दरात आजही घसरण पहायला मिळाली.

Updated: Jul 24, 2021, 01:24 PM IST
 Gold Price | सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; खरेदीची संधी चुकवू नका title=

नवी दिल्ली : सोने खरेदी करण्याची चांगली संधी आली आहे. आज सोने 46,870 रुपये प्रति तोळे इतके झाले आहे. सोन्याच्या दरात आजही घसरण पहायला मिळाली. सोने-चांदीच्या दरात नेहमीच चढ-उतार होत असल्याने गुंतवणूकदार नेहमीच गुंतवणूक करीत असतात. तसेच भारतातील अनेक सण उत्सवांमध्ये सोन्याला मागणी असते. त्यामुळे सध्या सोन्याचे दर किती याबाबत रिटेल तसेच गुंतवणूकदारांमध्ये कुतूहल असते.

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याची किंमत 47 हजार 526 रुपये प्रति तोळे इतकी होती. गेल्या काही दिवसांपासून सोन्यात होत असलेली वाढ अचानक थांबली आणि सोन्याच्या दरात घसरण  पहायला मिळाली. 

गेल्या वर्षी कोरोना काळात ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 55 हजाराच्या वर गेले होते. त्यापार्श्वभूमीवर अद्यापही सोने स्वस्त मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या दरांमध्ये वाढ दिसून येण्याची शक्यता आहे. आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव  47 हजार 860 प्रति तोळे इतका आहे.