मुंबई : दारू पिणे आरोग्यासाठी हानीकारक असले तरी, जगात मोठ्या संख्येने लोक दारूचे सेवन करतात. आजकाल दारू पिणे हे स्टेटस सिम्बॉल बनले आहे. मोठमोठे दिग्गज त्यांच्या घरातील पाहुण्यांसमोर सर्वात महागडी दारू सर्व्ह करतात. जेणेकरून त्यांचा दर्जा वाढेल. आज आम्ही तुम्हाला जगातील 5 सर्वात महागड्या दारूबद्दल सांगणार आहोत. त्यांची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.(Most Expensive Alcohol)
टकीला ले. 925
या यादीत टकीला ले.925 (Tequila Ley .925) चे नाव प्रथम येते. या दारूच्या बाटलीत 6400 हिरे जडले आहेत. ही वाइन मेक्सिकोमध्ये लाँच करण्यात आली. मात्र आजपर्यंत 6400 हिऱ्यांनी जडलेली ही दारूची बाटली कोणीही विकत घेतलेली नाही.
दिवा वोडका
ही वाइन दुसऱ्या क्रमांकावर येते. प्रत्येक बाटलीच्या मध्यभागी एक वेगळ्या प्रकारचा साचा असतो, ज्यामध्ये स्वारोवस्की क्रिस्टल्स (Swarovski Crystals)ठेवलेले असतात. ते पेय गार्निश करण्यासाठी वापरले जातात.
या बाटलीची किंमत 7 कोटी 30 लाख रुपये आहे. एका बाटलीची किंमत 15 किलो सोने असू शकते.
अमांड डी ब्रिग्नाक मेडास
अमांडा डी ब्रिग्नाक मिडास (Amanda De Brignac Midas) असे या वाईनचे नाव आहे. हे जगातील सर्वात महाग शॅम्पेन मानले जाते. या शॅम्पेनच्या(Champagne) बाटलीचा आकार खूप मोठा आहे.
या शॅम्पेनची किंमत 1 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त आहे. ती दिसायला खूप सुंदर दिसते.
डालमोर 62
त्याचे नाव Dalmore 62 आहे. ही जगातील सर्वात महागडी व्हिस्की मानली जाते. ती इतकी महाग आहे की आजपर्यंत त्याच्या फक्त 12 बाटल्या बनवल्या गेल्या आहेत.
या व्हिस्कीच्या (Whisky Price) एका बाटलीची किंमत 1 कोटी 50 लाखांपेक्षा जास्त आहे.
पेनफोल्ड्स एम्पूल
हे Penfolds Ampoule आहे. ही सर्वात महागडी रेड वाईन आहे. पेन सारख्या बाटलीत येणाऱ्या या वाईनची किंमत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये आहे.
ALCOHOLMOST EXPENSIVE, ALCOHOLALCOHOL PRICEEXPENSIVE, ALCOHOL, TEQUILA LEY .925, DIVA VODKAAMANDA, DE BRIGNAC, MIDASDALMORE 62, PENFOLDS AMPOULEBIZARRE,