'ट्रिपल तलाक'विरोधी विधेयक, महाराष्ट्राच्या या महिला खासदार गैरहजर

लोकसभेमध्ये आज तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर चर्चा आणि मतदान होणार असताना भाजपाच्या महाराष्ट्रातल्या तीन पॉवरफुल महिला खासदारांनी मात्र लोकसभेकडे पाठ फिरवली होती.

Updated: Dec 28, 2017, 10:51 PM IST
'ट्रिपल तलाक'विरोधी विधेयक, महाराष्ट्राच्या या महिला खासदार गैरहजर title=

नवी दिल्ली : लोकसभेमध्ये आज तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर चर्चा आणि मतदान होणार असताना भाजपाच्या महाराष्ट्रातल्या तीन पॉवरफुल महिला खासदारांनी मात्र लोकसभेकडे पाठ फिरवली होती.

या महत्त्वाच्या चर्चेवेळी सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षांच्या खासदारांची अनुपस्थिती खुपणारी होती. मतदानावेळी केवळ २५० सदस्यच उपस्थित असल्याचं चित्र दिसलं. या अनुपस्थित सदस्यांमध्ये भाजपाच्या पूनम महाजन, रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे या तिघींची अनुपस्थिती विशेष लक्षणीय ठरणारी राहिली.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाला पाठिंबा देणारं भाषण केलं. मात्र राज्यात महिलांचं नेतृत्व करणाऱ्या महिला खासदारांना इतर कामं महत्त्वाची वाटली का, असा सवाल आता उपस्थित होतोय.