Diwali 2020 : स्वस्तात सोनं खरेदी करायचंय, तर हे नक्की वाचा

तुमच्या हाती आहेत अवघे पाच दिवस   

Updated: Nov 17, 2020, 08:22 PM IST
Diwali 2020 : स्वस्तात सोनं खरेदी करायचंय, तर हे नक्की वाचा  title=

मुंबई : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच सर्वत्र उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. यातच सोनं खरेदीसाठी थेट केंद्र सरकारनं एक सोपा आणि तितकाच फायद्याचा पर्याय सर्वांना उपलबंध करुन देण्यात आला आहे. ज्याअंतर्गत ९ नोव्हेंबरपासून  Sovereign Gold Bond scheme ही योजना नव्यानं ग्राहकांच्या सेवेत आली आहे. 

भारत सरकारच्या वतीनं भारतीय रिझर्व्ह बँकेनं ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे. सोमवारी ९ नोव्हेंबरपासून सुरु झालेली ही योजना १३ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असेल.  ज्यामध्ये Sovereign Gold Bond चे दर ५१७७ रुपये निश्चित करण्यात आल्याची माहिती अधिकृत पत्रकातून देण्यात आली. 

ठराविक कालावधीसाठी उपलब्ध असणाऱ्या या योजनेअंतर्गत सेटलमेंटची तारीख १८ नोव्हेंबर असल्याचं सांगण्यात येत आहे. कोणा गुंतवणूकदारानं ही खरेदी ऑनलाईन पद्धतीनं केल्यास त्यावर प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट देण्यात येणार आहे. 

 

Small Finance आणि पेमेंट बँक वगळता गुंतवणूक, स्टॉक होल्डिंग बँक, पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचेंज मार्फत या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. ज्यामध्ये वर्षाला २.५० टक्के इतकं व्याज मिळणार आहे.