खूशखबर : यंदाच्या वर्षी होणार पगार वाढ; कपन्यांकडून पगार वाढीची प्रक्रिया सुरू

देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे  

Updated: Jul 9, 2020, 09:14 AM IST
खूशखबर : यंदाच्या वर्षी होणार पगार वाढ; कपन्यांकडून पगार वाढीची प्रक्रिया सुरू title=

नवी दिल्ली : फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सलग तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता देश अनलॉकच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यामुळे देशातील सर्व व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांचे वेतन कपात देखील करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या वर्षी पगार वाढ होणार नाही अशी भावना कर्मचाऱ्यांच्या मनात होती. 
 

परंतु, या सर्व महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. यंदा देखील कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ होणार आहे. त्यासाठी अनेक प्रसिद्ध कंपन्यांनी वेतन वाढीच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. वेतन वाढणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पगार वाढीसाठी बँकांनी केली सुरूवात 
देशातील सर्व खाजगी बँकांपैकी आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एक्सिस बँक (Axis Bank) यांनी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्याची घोषणा केली.  

या सर्व बँकांनी लॉकडाउन आणि कमी व्यवसाय असूनही यंदा आपल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना वेतन वाढीची घोषणा केली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक आयसीआयसीआय बँकेने  आपल्या कर्मचार्‍यांना आणि अधिकाऱ्यांना ८ टक्के वाढ जाहीर केली. 

ऑटो सेक्टर 
प्राप्त माहितीनुसार मारुती सुझुकी ऑगस्ट महिन्यात आपल्या कर्मचार्‍यांचे व अधिकाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करेल. लॉकडाऊनमुळे इतर वर्षी होणाऱ्या पगार वाढीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी होणारी पगार वाढ कमी असणार आहे. त्याचप्रमाणे KIA Motors आणि  GM Motor देखील त्यांच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पगार वाढ करणार आहे.