Throwback Photo: व्हाइट फ्रॉकमध्ये दिसणारी ही मुलगी होती रतन टाटांची गर्लफ्रेण्ड! आज जगतेय एकाकी आयुष्य

Throwback Photo: या फोटोमध्ये दिसणारी चिमुकली ही एक प्रसिद्ध सेलिब्रिटी असून ती काही वर्ष प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना डेट करत होती. लग्न करण्याची इच्छा असूनही काही कारणास्तव त्यांचं लग्न झालं नाही.

Updated: Mar 8, 2023, 09:40 AM IST
Throwback Photo: व्हाइट फ्रॉकमध्ये दिसणारी ही मुलगी होती रतन टाटांची गर्लफ्रेण्ड! आज जगतेय एकाकी आयुष्य title=
Ratan Tata

Viral Photo Ratan Tata Connection: सोशल मीडिया हे सेलिब्रिटींसाठी आपल्या चाहत्यांबरोबर कनेक्टेड राहण्यासाठी एक उत्तम माध्यम म्हणून मागील काही वर्षांमध्ये समोर आलं आहे. अनेकदा सेलिब्रिटींनी पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातही सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. अशाच एका सेलिब्रिटीचा जुना फोटो मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.

एकेकाळी या सेलिब्रिटीने प्रसिद्ध उद्योजक रतन टाटांनाही (Ratan Tata) डेट केलं होतं. या थ्रो बॅक फोटोमध्ये ही सेलिब्रिटी अगदीच लहान असून तिचा गोंडस लूक कोणाचंही लक्ष वेधून घेणारा आहे. या गोंडस मुलीने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक परिधान केलेला आहे. या फोटोमध्ये सध्या प्रसिद्ध सेलिब्रिटी असलेली ही व्यक्ती आपल्या बहिणीबरोबर उभं असल्याचं दिसत आहे. ही सेलिब्रिटी कोण आहे तुम्हीच ओळखा पाहू...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Simi Garewal (@simigarewalofficial)

कोण आहे ही व्यक्ती?

तु्म्हाला ही व्यक्ती कोण आहे हे समजलं नसेल तर उत्तर आम्ही देतो. एक काळ गाजवणारी ही अभिनेत्री आहे, सिमी ग्रेवाल (Simi Garewal). सिमी ग्रेवाल यांनी एकेकाळी रतन टाटांना (Ratan Tata) डेट केलं होतं. दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. दोघांनाही लग्न करण्याची इच्छा होती. मात्र काही कारणाने त्याचं नातं फिस्कटलं. नातं फिस्कटल्यानंतर पुन्हा एकदा रतन टाटा सिमी ग्रेवाल यांच्या टॉक शोमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळीही त्यांनी आपलं लग्न अनेकदा होता होता राहिलं. तर दुसरीकडे सिमी ग्रेवाल यांचं पहिलं लग्न तुटल्यानंतर आणि रतन टाटांच्या रुपात पुन्हा प्रेम सापडल्यानंतरही लग्न केलं नाही.

पहिलं लग्न अन् इतर अभिनेत्यांशी जोडलं गेलेलं नाव

सिमी ग्रेवाल यांचं पहिलं लग्न रवि मोहन यांच्याशी झालं होतं. 3 महिन्यांच्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केलं होतं. त्यामुळे काही वर्षांमध्येच दोघांचं लग्न तुटलं. इतकच नाही तर लग्नाआधी म्हणजेच वयाच्या 17 व्या वर्षी सिमी ग्रेवाल यांनी जामनगरच्या महाराजांनाही डेट केलं होतं. सिमी ग्रेवाल यांच्या आयुष्यात मंन्सूर अली खान पतौडी यांनाही खास स्थान होतं. मात्र शर्मिला टागोर यांच्यामुळे या दोघांमधील नातं पुढे सरकलं नाही. आज सिमी ग्रेवाल एकट्याच असून त्यांनी पुन्हा लग्न केलेलं नाही.