पर्रिकर यांच्या मुलावर भाजपच्या दारामध्ये भीक मागण्याची वेळ - संजय राऊत

Sanjay Raut on Goa Election : गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. 

Updated: Jan 22, 2022, 12:24 PM IST
पर्रिकर यांच्या मुलावर भाजपच्या दारामध्ये भीक मागण्याची वेळ - संजय राऊत  title=

मुंबई : Sanjay Raut on Goa Election : गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. गोव्यात ज्यांना पक्ष वाढवला, त्यांच्याच मुलाला भाजपच्या दारामध्ये भीक मागायची वेळ आली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ( Sanjay Raut on BJP) माजी मुख्यमंत्री  दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या मुलाला (Manohar Parrikar's son Utpal Parrikar) भाजपकडून तिकीट न मिळाल्याने ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उरणार आहेत. 

संजय राऊत म्हणाले, मनोहर पर्रिकर हे गोव्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख संस्थापक होते त्यांनी कष्ट केले आहेत. आज त्यांच्या मुलावर (उत्पल पर्रिकर) भाजपच्या दारामध्ये भीक मागायची वेळ यावी अशा प्रकारे भाजपला कन्व्हिन्स करायची वेळ आली आहे. पर्रिकर यांचा मुलगा वैतागला आहे. त्यांनी भाजपचा त्याग केला आहे. त्यांची वेदना मी समजून घेतो. ज्या पक्षात त्यांचा जन्म झाला तो पक्ष सोडताना अशा वेदना होतात, त्या मी त्यांच्या चेहऱ्यावरती अनुभवल्या आहेत. आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहेत. 

भारतीय जनता पार्टीने जी 34 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, त्या सगळ्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट शिवसेने जवळ आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर सारख्या कार्यकर्त्यांनी गोव्यामध्ये भाजपाची बिजे रोवली. हे सगळे चारित्र्यवान कार्यकर्ते होते  आज तेही म्हणत आहेत की, भारतीय जनता पार्टी ला मी पैसे देऊ शकलो नाही म्हणून माझी उमेदवारी नाकारली गेली. हे दुर्दैवी आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासोबत माझी चर्चा झाली होती.  परंतु गोव्याचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हे समजत नाही. परंतु ते आमचं ऐकत नाहीत एवढा कॉन्फिडन्स त्यांना कोठून येत आहे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

तर दुसरीकडे राऊत यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलार यांना मी नेहमीच चहा पाजत असतो  डिपॉझिट गेलं म्हणून निवडणुका लढायच नाहीत , असे निवडणूक आयोगाने कुठे सांगितले आहे.  आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. आम्ही तुमच्या सारखे भ्रष्ट माफिया धनदांडगे यांना जर उमेदवारी दिली असती तर आम्ही जिंकून आलो असतो, असे जोरदार टोला लगावला.