मुंबई : पैशाने पैसा ओढता येतो. हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून पैसे कमावायचे असतील तर, उत्तम परताव देण्याची क्षमता असणाऱ्या शेअरमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे ठरते. योग्य शेअरची निवड करण्यासाठी रिसर्च, अभ्यास आणि मार्केटची चाल लक्षात घेणे गरजेचे असते.
मार्केट एक्सपर्ट् पॅनलवर संदीप जैन यांनी Apcotex Industries या शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. ही एक शानदार क्वॉलिटी कंपनी आहे. कंपनी 1980 पासून कार्यरत असून Asian Paintsचे मॅनेजिंग डायरेक्टर अतुल चौकसी आता या कंपनीचे प्रमोटर आहेत. कंपनीच्या उत्पन्नात सलग वाढ होत असल्याचेही जैन यांनी म्हटले आहे.
Apcotex Industries - Buy
CMP - 352.95
Target - 390/430
अवधी - 6-9 महीने
कसे आहेत कंपनीचे फंडामेंटल्स
जैन यांनी सांगितले की, कंपनी आले कर्ज कमी करीत आहे. कंपनीचा डिविडंड रेशो 56 टक्के आहे. मागील 5 वर्षात कंपनीची ग्रोथ 16-17 टक्क्यांचा आसपास आहे.
कंपनीचे जून तिमाहीचे निकाल
मागील वर्षीच्या जून तिमाहीमध्ये कंपनीला 16 कोटींचा तोटा झाला होता. परंतु या वर्षीच्या जून तिमाहीमध्ये कंपनीने 22 कोटींचा नफा सादर केला आहे.