Petrol Price : गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज ( 30 ऑक्टोबर ) देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel rate) नवीनतम दर देखील जाहिर केले आहेत. भारतात आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील सर्व शहरांमध्ये वाहनांच्या इंधनाचे दर स्थिर आहेत. (Today Petrol Diesel Price in Maharashtra on 30 October 2022)
एनसीआरमध्ये तेलाची किंमत
देशाची राजधानी दिल्लीत (delhi petrol price) एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. नोएडामध्ये पेट्रोलचा दर 96.79 रुपये आणि डिझेलचा दर 89.96 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय गाझियाबादमध्ये पेट्रोल 96.58 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे आणि डिझेलची किंमत 89.75 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. त्याच वेळी, गुरुग्राममध्ये पेट्रोलचा दर 97.18 रुपये आणि डिझेलचा दर 90.05 रुपये प्रति लिटर आहे.
महानगरांमध्ये तेलाची किंमत
तर मुंबईत (Mumbai Petrol Price) पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. याशिवाय कोलकात्यात पेट्रोलचा दर 92.76 रुपये तर डिझेलचा दर 106.03 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लीटर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलच्या किमतीत चढ-उतार होत असताना 21 मे पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बऱ्याच दिवसांपासून कायम आहेत.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
राज्यस्तरीय करांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 92249 92249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर (एक लिटर )
शहर - पेट्रोल - डिझेल (रूपये)
अहमदनगर - 106.62 रूपये - 93.13
अकोला - 106.66 - 93.19
अमरावती - 107.44 रूपये - 93.94
औरंगाबाद - 106.52 रूपये - 93.02
भंडारा - 107.01 रूपये - 93.53
बीड - 107.76 रूपये - 94.24
बुलढाणा - 106.89 - 93.41
चंद्रपूर - 106.42 रूपये - 92.97
धुळे - 106.13 रूपये - 92.66
गोंदिया - 107.53 रूपये - 94.02
बृहन्मुंबई - 106.31 रूपये - 94.27
हिंगोली - 107.93 रूपये - 94.41
जळगाव - 107.33 रूपये - 93.83
जालना - 108.20 रूपये - 94.65
कोल्हापूर - 106.90 रूपये - 93.42
लातूर - 107.94 रूपये - 94.41
मुंबई शहर - 106.31 रूपये - 94.27
नागपूर - 106.21 रूपये - 92.75
नांदेड - 108.37 रूपये - 94.83
नंदुरबार - 107.22 रूपये - 93.71
नाशिक - 106.77 रूपये - 93.27
उस्मानाबाद - 107.41 रूपये - 93.90
पालघर - 106.39 रूपये - 92.87
परभणी - 109.47 रूपये - 95.86
पुणे - 106.14 रूपये - 92.66
रायगड - 106.81 रूपये - 93.27
रत्नागिरी - 107.47 रूपये - 93.93
सांगली - 106.86 रूपये - 93.38
सातारा - 107.18 रूपये - 93.66
सिंधुदुर्ग - 107.97 रूपये - 94.45
सोलापूर - 106.58 रूपये - 93.10
ठाणे - 106.38 रूपये - 94.34
वर्धा - 106.53 रूपये - 93.06
वाशिम - 106.95 रूपये - 93.47
यवतमाळ - 107.45 रूपये - 93.95