Petrol-Diesel Price on 23 September 2022: तुमच्या शहरात आज पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते एका क्लिकवर जाणून घ्या..

Updated: Sep 23, 2022, 07:56 AM IST
Petrol-Diesel Price on 23 September 2022: तुमच्या शहरात आज पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या   title=

Petrol Diesel Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण झाली आहे. असे असतानाही चार महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel) दर मात्र स्थिर आहेत. महाराष्ट्र आणि मेघालय वगळता इतर सर्व राज्यांतील तेलाच्या किंमती चार महिन्यांपूर्वी बदलण्यात आल्या होत्या. त्यावेळी केंद्र सरकारने (Central Govt) तेलाच्या किमतीवरील उत्पादन शुल्क कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला होता. (today petrol diesel rate on 23 september 2022)

कच्चे तेल नवीनतम दर

मेघालयात गेल्या दिवसभरात पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel rate) दरात दीड रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात शिंदे सरकार (Shinde Govt) आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. पुन्हा एकदा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $90 च्या खाली गेली आहे. शुक्रवारी सकाळी (23 सप्टेंबर) WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $83.70 वर पोहोचली. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 90.62 वर दिसले.

यापूर्वी 22 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. यानंतर लगेचच काही राज्य सरकारांनीही व्हॅट कमी केला.

शहर   -  पेट्रोल (प्रति लिटर ) -  डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर - 106.53 - 93.03
अकोला - 106.14 - 92.69
अमरावती - 107.23 - 93.74
औरंगाबाद - 107.75 - 94.24
भंडारा - 106.75 - 93.22
बीड - 107.46 - 93.94
बुलढाणा - 108.811 - 94.55
चंद्रपूर - 106.39 - 92.94
धुळे - 106.01 - 92.54
गडचिरोली - 106.82 - 93.45
गोंदिया - 107.84 - 94.32
बृहन्मुंबई - 106.31 - 94.27
हिंगोली - 107.93 - 94.41
जळगाव - 107.19 - 93.70
जालना - 107.85 - 94.30
कोल्हापूर - 106.47 - 93.01
लातूर - 107.19 - 93.69
मुंबई शहर - 106.31 - 94.27
नागपूर -106.04 - 92.59
नांदेड - 108.32 - 94.78
नंदुरबार - 106.99 - 93.49
नाशिक - 106.43 - 93.34
उस्मानाबाद - 107.35 - 93.84
पालघर -106.06 - 93.55
परभणी - 108.79 - 95.21
पुणे - 105.77 - 92.30
रायगड 105.80 - 92.30
रत्नागिरी - 107.24 - 93.68
सांगली - 106.41 - 92.95
सातारा -107.42 - 93.88
सिंधुदुर्ग - 107.86 - 94.34
सोलापूर - 106.49 - 93.04
ठाणे - 105.97 - 92.47
वर्धा - 107.01 - 93.52
वाशिम - 106.91 - 93.43
यवतमाळ - 107.29 - 93.80

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर 

- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर