रिझर्व्ह बँकेच्या 'या' निर्णयामुळे गृह, वाहनकर्ज स्वस्त होणार?

रिझर्व्ह बँक आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे

Updated: Oct 4, 2019, 09:12 AM IST
रिझर्व्ह बँकेच्या 'या' निर्णयामुळे गृह, वाहनकर्ज स्वस्त होणार?
संग्रहित फोटो

मुंबई : रिझर्व्ह बँक आज चलनाविषयक पतधोरणचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे. या आढाव्यात व्याजाच्या दरात पुन्हा एकदा कपात होण्याची शक्यता आहे. रेपो दरात सुमारे पाव टक्क्याची कपात होईल असा बाजाराचा अंदाज आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात गृह आणि वाहनकर्ज आणखी स्वस्त होण्याची आशा आहे. 

दोन महिन्यांपूर्वीच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी शून्य पुर्णांक ४० टक्क्यांची दरकपात जाहीर केली होती. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीतही सरकारी बँकांमधून मिळणारी गृहकर्जं गेल्या सात वर्षांतल्या सर्वात कमी व्याजदरात उपलब्ध आहेत. त्यात आता पुन्हा एकदा कपात झाल्यास व्याजदर आणखी खाली उतरतील. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank) चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक सुरू आहे. आज या बैठकीचा शेवटचा दिवस असून आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर्थिक धोरण आढावा निकाल जाहीर करणार आहे. 

रिझर्व्ह बँकेने या वर्षात सलग ४ वेळा रेपो दरात १.१० टक्क्यांची कपात केली आहे.

दरम्यान गेल्या साधारण वर्षभरात सातत्याने रिझर्व्ह बँक व्याजाच्या दरात कपात करून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न करते आहे.