Viral Video: तावातावानं उठला, सामान गुंडाळलं... प्रवाशाला खाली खेचलं अन् धु धु धुतला!

Train Fight In Pawan Express: एक व्यक्ती पवन एक्सप्रेसमध्ये विना तिकीट (Travel without ticket) जनरल बोगीमध्ये बसून प्रवास करत होता. टीसीने त्याला तिकीट दाखवण्यास सांगितलं. मात्र...

Updated: Jan 6, 2023, 09:40 PM IST
Viral Video: तावातावानं उठला, सामान गुंडाळलं... प्रवाशाला खाली खेचलं अन् धु धु धुतला! title=
Train Fight Video

Train Viral Video: लांब पल्ल्याच्या प्रवासात नेहमी प्रवाशांमध्ये भांडणं (Fight) झाल्याचं पहायला मिळतं. सोशल मीडियावर (Social Media) देखील अनेक भांडणाचे व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होत असतात. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ रेल्वेमधील (Train Fight Video) असल्याचं पहायला मिळतंय. ट्रेनच्या आत एक माणूस टीटीईला (TTE) भिडताना दिसला. त्यामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. (Train Fight Viral Video two ttes were seen manhandling a passenger in pawan express marathi news)

व्हायरल व्हिडिओमध्ये (Fight Video) एक टीसी असल्याचं सांगितलं जातंय. नेहमीप्रमाणे तिकीट चेकर आपलं काम करत होता. एक माणूस टीसीला भिडताना दिसला. यादरम्यान दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. शाब्दिक युद्ध एवढं पेटलं की, गोष्ट हाणामारीवर आली. हे प्रकरण लोकमान्य टिळक टर्मिनलवरून (LTT) जयनगरकडे जाणाऱ्या पवन एक्स्प्रेसशी (Pawan Express) संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा - Viral Video : वहिनीचा 440 व्होल्ट करंटचा डान्स, VIDEO होतोय व्हायरल

समोर आलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती पवन एक्सप्रेसमध्ये विना तिकीट (Travel without ticket) जनरल बोगीमध्ये बसून प्रवास करत होता. टीसीने त्याला तिकीट दाखवण्यास सांगितलं. मात्र, त्याने तिकीट नसल्याचं सांगितलं. त्यानंतर दोन टीटी आणि प्रवाशामध्ये वाद पेटला. त्यानंतर दोन टीटीने मिळून प्रवाशाला जबर मारहाण केल्याचं वृत्त आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये टीटी प्रवाशाला खाली खेचलं आणि लाथा बुक्क्यांनी त्याला मारलंय.

पाहा Video -

दरम्यान, प्रवाशाच्या एका गोष्टीचा राग आल्याने टीटी तावातावाने उठला, सामान गुंडाळलं आणि प्रवाशाला खाली खेचलं. त्यानंतर त्याने थेट तोंडावर मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर आणखी एका टीटीने प्रवाशाच्या शरिरावर लाथा बुक्क्यांनी वार केले. त्यावेळी काही प्रवाशांना दोघांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच काहींनी व्हिडिओ (Trending Video) काढून टीटीची दादागिरी सर्वांसमोर आणली आहे.

(Disclaimer: व्हायरल झालेल्या व्हिडिओची झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही)