'त्या' Swiggy Delivery Girl ची तुफान चर्चा; संर्घषाच्या कहाणीने लाखो यूजर्सच्या हृदयाला केला स्पर्श

Swiggy Delivery Girl: आपण Delivery घेऊन येणाऱ्या एजंटला उशीर झाला म्हणून आपण काही न जाणून घेता त्यांच्यावर फोन करुन भडकतो. तर कधी त्यांची मजबुरी समजली तर सौम्य भाषेत बोलतो. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर लाखो यूजर्सच्या हृदयाला स्पर्श करत आहे. 

Updated: Sep 9, 2022, 12:30 PM IST
'त्या' Swiggy Delivery Girl ची तुफान चर्चा; संर्घषाच्या कहाणीने लाखो यूजर्सच्या हृदयाला केला स्पर्श title=
Treading News swiggy delivery girl arrives in a wheelchair customers who order food

Swiggy agent delivers food in wheelchair: 'Where there is a will, there is a way' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. आपण अनेक वेळा म्हणतो एखादी गोष्ट करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ती पूर्ण करता. अनेक वेळा आपण बाहेर जायचा कंटाळा येतो म्हणून भूक लागल्यावर बाहेरून जेवण ऑर्डर करतो. यानंतर आपण घरात बसून डिलिव्हरी एजंटची वाट पाहत असतो. तो वेळेत यावा अशी आपली इच्छा असते. आपण Delivery घेऊन येणाऱ्या एजंटला उशीर झाला म्हणून आपण काही न जाणून घेता त्यांच्यावर फोन करुन भडकतो. तर कधी त्यांची मजबुरी समजली तर सौम्य भाषेत बोलतो. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर लाखो यूजर्सच्या हृदयाला स्पर्श करत आहे. (Treading News swiggy delivery girl arrives in a wheelchair customers who order food)

व्हीलचेअरवर आली Swiggy Delivery Girl

सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट पाहून कोणाचीही मान शर्मेने खाली जाईल. झालं असं की, एका व्यक्तीने जेवण्याची ऑर्डर केली,तर या ग्राहकांकडे एक महिला   Swiggy ची टी-शर्ट घातलेली आणि व्हीलचेअरवर जेवण घेऊन आली. ही पोस्ट जगविंदर सिंग घुमान (Jagvinder Singh Ghumaan) नावाच्या युजरने लिंक्डइनवर (LinkedIn) शेअर केली आहे. त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम्हाला ऑफिसला उशीर झाला, तर तुम्ही फालतू कारणं देतात. पण खरे हिरो कठोर परिश्रम करत आणि कारणांकडे दुर्लक्ष करत आपलं आयुष्य जगतात.''

Swiggy Delivery Girl चं कौतुक 

एका युजरने म्हटलं की, ''हे त्यांच्यासाठी आश्चर्यकारक आणि धाडसी आहे. Swiggy ला सलाम, कारण त्यांनी त्यांना वेगळं मानलं नाही.'' तर अजून एक युजर्स म्हणतो की, ''लाखो लोकांना प्रेरणा देते, हे उत्तम प्रकारे दाखवून देते की जर एखाद्यामध्ये जीवनात काहीतरी करण्याची जिद्द आणि इच्छा असेल तर ते एक दिवस त्यांचा मार्ग शोधतातच. तसंच या दिशेने कंपन्यांनी अधिक पुढाकार घेतला पाहिजे.''