Girl Viral Video : ''ती तर चंद्र आहे...'', तरुणीचा डान्स पाहून व्हाल घायाळ

Girl Dance Video : ती चंद्र आणि नृत्यातील भाव चंद्र...सोशल मीडियावर या तरुणीचा डान्स नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 11, 2023, 05:30 PM IST
Girl Viral Video : ''ती तर चंद्र आहे...'', तरुणीचा डान्स पाहून व्हाल घायाळ  title=
Trending beautiful Girl Dance on ranbir kapoor yoon shabnami Video Viral on Social media google trend now

Girl Dance Viral Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. जणू हा व्हिडीओचा खजिनाच आहे. इथे तुम्हाला मनोरंजनापासून, धक्कादायक आणि माहितीपूर्ण असे वेगवेगळे व्हिडीओ पाहिला मिळतात. ये तो रील्स का जमाना है! असं म्हटलं तरी चालेल. बघावं तिकडे तरुणाई सोशल मीडियासाठी रील्स बनवताना दिसतात. यातील काही रील्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतात. एखाद्या चित्रपटातील गाण्यावर डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला. की पुढच्या काही क्षणात तो सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये येतो. 

'तू चंद्र आहे...' 

सोशल मीडियावर एखाद्या घटनेला वाचा फोडली जाते. तसंच या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून एखाद्यातील छुपी कला ही जगासमोर येते. अशाच एका तरुणाच्या डान्सने सोशल मीडियाला वेड लावलं आहे. एखाद्या अभिनेत्रीच्या सौंदर्यालाही मात दिसेल असं या तरुणीचं सौंदर्य आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. 

अप्रितम, अप्रितम...

वाऱ्यासारखा पसरलेल्या या व्हिडीओमधील तरुणीने सावरिया या चित्रपटातील रणबीर करूरच्या यूं शबनमी (Yoon Shabnami) या गाण्यावर डान्स केला आहे. तिची अदा आणि भाव पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. शुभ्र पांढऱ्या रंगाच्या सलवार कुर्त्यातील हा डान्स वारंवार बघावा असा आहे. तिचं रुप एखाद्या सुंदर परीसारखं आहे, असे नेटकरी म्हणते आहेत. काही जण तर तिला लवकराच लवकर चित्रपटसृष्टीत पदार्पण कर असा सल्लाही यूजर्स देत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो यूजर्सने पाहिला आहे. व्हिडीओची सुरुवातीला ही तरुणी पाठमोरी असते. त्यानंतर ती फिरते आणि ज्याप्रकारे चंद्रकडे पाहते. तिची ती नजर यूजर्सच्या हृदय घायाळ करत आहे. (Trending beautiful Girl Dance on ranbir kapoor yoon shabnami Video Viral on Social media google trend now)

तुझ्या कोणी का प्रेमात पडणार नाही?

एका युजर्सने लिहिलं आहे की, ''तुझे डोळे अक्षरश: निशब्द करतात. तू तुझ्या डोळ्यांनी आणि भावनेने कोणालाही घायाळ करु शकते. कोणी तुझ्या प्रेमात का नाही पडणार?''

दुसऱ्या युजर्सने लिहिलंय की, “ती स्वर्गात नाचणाऱ्या देवदूतासारखी आहे, चांद स्वतः चंद्रासारखी तेजस्वी आहे.”

“ती चंद्र आहे आणि तिचे भाव चंद्रप्रकाश आहेत,” असं एका यूजर्सने लिहिलं आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूटवर व्यवसायाने कोरिओग्राफर असलेल्या इमान नावाच्या तरुणीने पोस्ट केला आहे. 

हेसुद्धा वाचा - Girl Viral Video : पिवळ्या नऊवारीमधील 'या' तरुणीचा डान्स पाहिला का?