आंघोळ करताना का होतो गिझरचा स्फोट?, हा व्हिडीओ एकदा पाहाच

Trending News In Marathi: गिझर सुरू ठेवून आंघोळीला जाताय. तर थांबा तुमची ही चूक जीवावर बेतू शकते. पाहा हा व्हिडिओ

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 6, 2023, 12:14 PM IST
आंघोळ करताना का होतो गिझरचा स्फोट?, हा व्हिडीओ एकदा पाहाच title=
trending news in marathi This Is The Reason Of Geyser Blast While Bathing

Trending News In Marathi: नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर थंडीची चाहूल जाणवायला सुरुवात झाली आहे. देशातील काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसांत गरम व कडकडीत पाण्याने अंघोळ केली जाते. अशावेळी गिझरचा वापर जास्त प्रमाणात होत असतो. हल्ली प्रत्येक घरा घरात गीझरचा वापर वाढला आहे. मात्र, गीझरचा वापर करताना काळजी घेणेही गरजेचे आहे. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक तरुणी गिझरच्या वापराबाबत लोकांना सावधानतेचा इशारा देत आहे. 

तुम्ही देखील गिझर सुरू करुन बाथरुममध्ये आंघोळ करत असाल तर तुम्ही देखील या व्हिडिओकडे दुर्लक्ष करु नका. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.  seetrendinginformation नावाच्या अकाउंटवरुन साधारण 6 दिवसांपूर्वी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात एक मुलगी तिच्या घरात लावलेल्या गिझरच्या अपघाताबाबतचा अनुभव लोकांना सांगत आहे. तसंच, एक सावधानतेचा इशारादेखील देत आहे. तुम्ही देखील गिझर सुरू ठेवून बाथरुममध्ये आंघोळ करत असाल तर तुमच्यावर मोठं संकट ओढावू शकतं. 

व्हिडिओत मुलगी सांगताना दिसत आहे की, जेव्हा पण तुम्ही आंघोळीसाठी जाल तेव्हा गीझर साधारणपणे 5 मिनिटे आधी सुरू करा आणि गिझर बंद केल्यानंतरच बाथरुममध्ये जा. गिझर सुरू असताना आत कोणतेही काम करु नका. मी तुम्हाला इतकं विनंती करुन सांगत आहे कारण की आज आमच्या घरी एक मोठा अपघात झाला आहे. ते उद्या तुमच्या घरीही घडू शकतं, असं तिने म्हटलं आहे.

तरुणीने व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, बाथरुममध्ये आंघोळीसाठी जात असताना हा व्हिडिओ अवश्य बघा. स्विच ऑन राहिल्याने बाथरुममधील गिझरचा मोठा स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण बाथरुममध्ये आगीच्या ठिणग्या उडत होत्या ही परिस्थिती खूपच भयावह होती. दरम्यान, मार्केटमध्ये आजकाल असे अनेक इन्स्टंट गिझर आले आहेत. यात जवळपास 20 लीटर पाणी 10 मिनिटात गरम होते. शक्य झाल्यास गीझर सुरू ठेवून बाथरुममध्ये जाऊ नका. या चुकीमुळं मोठं संकट निर्माण होऊ शकते. 

दरम्यान, तरुणीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गिझर सुरू ठेवून बाथरुममध्ये जात असाल तर हा व्हिडिओ एकदा जरुर पाहा. हा व्हिडिओवर आतापर्यंत लाखो लोकांनी लाइक आणि कमेंट केल्या आहेत.