इस्रो प्रमुख सोमनाथ आत्मचरित्रामुळे एक पाऊल मागे? वाद चिघळल्यानंतर घेतला मोठा निर्णय

K Somnath Nilavu Kudicha Simhanal: एस. सोमनाथ यांनी त्यांचे आत्मचरित्र 'निलावु कुडिचा सिम्हल' च्या प्रकाशनासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Nov 6, 2023, 11:15 AM IST
इस्रो प्रमुख सोमनाथ आत्मचरित्रामुळे एक पाऊल मागे? वाद चिघळल्यानंतर घेतला मोठा निर्णय  title=

K Somnath Nilavu Kudicha Simhanal: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या आत्मचरित्रामुळे देशभरात खळबळ उडाली होती. यामध्ये त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले होते. यातून अनेक वाद निर्माण होऊ लागले होते. यामध्ये त्यांनी माजी इस्रो प्रमुख सिवन यांच्यावर आरोप केले होते. देशभरात उडालेल्या खळबळीनंतर त्यानंतर आता एस. सोमनाथ यांनी आपले 'निलावु कुडिचा सिम्हल' या आत्मचरित्राचे प्रकाशन तुर्तास टाळण्याचा निर्णय घेतला आहे. 'लायन्स दॅट ड्रिंग द मूनलाइट' असा याचा इंग्रजी अनुवाद होतो. 

एका महत्वाच्या पदासाठी अनेक व्यक्ती पात्र असतात. कोणत्याही संस्थेच्या शिखर स्थानी पोहोचण्यासाठी व्यक्तीला खूप मोठा संघर्ष करावा लागतो. मी त्या बिंदुला समोर आणण्याचा प्रयत्न केला. हे करताना मी कोणत्या व्यक्ती अथवा संस्थेवर निशाणा साधला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

 टिका करणे हा हेतू नाही

ज्यांना आयुष्यात अनेक अडचणींवर मात करत आव्हाने स्वीकारली आहेत, अशा लोकांना प्रेरणा देण्याचा माझ्या आत्मकथेतून प्रयत्न करण्यात आला आहे. कोणावर टिका करणे हा हेतू नाही, असे सोमनाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

 त्यावेळी, घाई आणि गडबडीमुळे इस्त्रोचं चांद्रयान-2 मिशन फेल ठरलं, असंही सोमनाथ यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.  चांद्रयान-2 च्या अपयशाची घोषणा करताना ज्या चुका झाल्या होत्या त्या लपल्या होत्या. जे काही घडत आहे ते त्याच पद्धतीने सांगितलं पाहिजे, असं मत देखील त्यांनी यावेळी मांडलं आहे.

 पुढे जाण्याची प्रेरणा

 दरम्यान, अपयशाचं सत्य लोकांसमोर मांडलं पाहिजे. त्यामुळे संस्थेमध्ये पारदर्शकता समोर येते, तसेच लोक त्यांच्या आव्हानांशी लढताना पुढे जाण्याची प्रेरणा घेऊ शकतात, असंही सोमनाथ यांनी म्हटलं आहे.  मी माझ्या आयुष्यात आलेल्या आव्हानांबद्दल लिहिलंय, मला कोणालाही काही दोष देयचा नाही, असं सोमनाथ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता माजी चीफ आणि विद्यमान चीफ यांच्या छुपा संघर्ष होता का? असा सवाल आता विचारला जात आहे.