Trending news Sages and Ascetics Wear Saffron : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone) यांचा पठाण चित्रपटातील बेशर्म रंग ( Pathaan Besharam Rang Song) वरुन जो काही गदारोळ झाला. त्यानंतर भगवा रंगाबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे. या रंगाचे अनेक कपडे आपल्याकडे आहेत. या रंगाच्या कपड्यांनी कोणाच्या भावना कशा दुखवल्या गेल्या. तुम्ही कधी यायचा विचार केला आहे का, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) असो किंवा साधुसंत, ऋषी, तपस्वी हे भगव्या रंगाचे (Saffron colored) कपडे का घालतात?
आपल्या सनातन धर्मात ऋषी, तपस्वी, साधुसंतांना खूप महत्त्व आहे. आता हे संत कायम भगव्या रंगाचे कपडे का परिधान करतात. शास्त्रानुसार या रंगाचा काय अर्थ आहे. तर शास्त्रानुसार भगव्या, केशरी किंवा गेरु रंग म्हणजे त्यागाचे प्रतीक मानलं जातं. शिवाय या रंगाकडे जीवनात येणारा नवा प्रकाश या अर्थाने पाहिलं जातं. शास्त्रात असं म्हटलं गेलं आहे की, सूर्याची किरणेदेखील भगव्या रंगाची असतात जी जीवनात नवी पहाट घेऊन येते.
शास्त्रानुसार आपल्या शरीरात सात चक्र असतात. त्यातील आज्ञा चक्राचा रंग हा भगवा असतो. तर आज्ञा चक्र हे ज्ञानप्राप्तीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे आध्यात्मिक मार्गावर चालणारे व्यक्ती या रंगाचे कपडे परिधान करतात. याशिवाय हे देखील एक कारण समोर आले आहे. असं कपडे घालणाऱ्या लोकांकडे समाज एका वेगळा दुष्टीने पाहतात. त्यांचाशी कसं वागायचं आणि कसं बोलायचं हे या रंगावरुन समाजातील लोकांना समजतं. (Trending news Why do sages and ascetics wear saffron colored clothes You will be speechless to know the reason marathi news)
असं म्हणतात की, बहुतेक फळे पिकल्यावर त्यांचा रंग केशरी,पिवळा किंवा भगवा होतो. म्हणजेच हा रंग परिपक्वता देखील दर्शवतो. हा रंग ज्ञानाचा सूचक मानला जातो आणि हे दर्शविते की हा रंग परिधान केलेल्या व्यक्तीने जगाच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)