Viral Video | रात्री कॅबची वाट पाहणाऱ्या मुलींना 'तो' प्रश्न विचारणं पडलं महागात

 मुलांनी त्या मुलींना रात्रभराचे रेट विचारल्याने हा वाद झाल्याचे दिसून येत आहे.

Updated: Jul 28, 2021, 03:42 PM IST
Viral Video | रात्री कॅबची वाट पाहणाऱ्या मुलींना 'तो' प्रश्न विचारणं पडलं महागात

नवी दिल्ली : दिल्लीच्या होज खास विलेजमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये नॉर्थ ईस्टच्या काही मुली आणि दिल्लीचे मुलांमध्ये भांडण दिसून येत आहे. मुलींनी या मुलांवर विनयभंगाचा आरोप लावला आहे. मुलांनी त्या मुलींना रात्रभराचे रेट विचारल्याने हा वाद झाल्याचे दिसून येत आहे.

दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्ष स्वाती मालीवालने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या मुलींशी संपर्क साधला. त्यावेळ मिळालेल्या माहितीनुसार, मुली आपल्या मित्रांसोबत हौसखास विलेजमधील एका बारमध्ये गेल्या होत्या. तेथून बाहेर पडल्यानंतर त्या कॅब येण्याची वाट पाहत होत्या. त्यावेळी तेथून जाणाऱ्या मुलांनी त्यांच्यावर अश्लिल कमेंट केल्या.

गुन्हा नोंदवला
त्या मुलांनी आपल्याला रात्रभराचा रेट विचारल्याचा आरोप मुलींनी केला. त्यानंतर तिच्या मित्रांनी याघटनेचा व्हिडिओ बनवायला सुरूवात केली. वादावादीनंतर त्या मुलांनी कान पकडून माफी मागितली. या घटनेनंतर पोलिसांनी मुलांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर लोकांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली.