Couple Viral Video : प्रेमीयुगुलाची गच्चीवर रासलीला सुरु असताना अचानक आई आली अन् मग...

Viral Video :  आता तर हद्दच झाली...भरदिवसा गच्चीवर चादरीच्या आता प्रेमीयुगुलाची रासलीला सुरु होती. या घटनेचा व्हिडीओ बाजूच्या एका गच्चीवरुन घेण्यात आला. एवढंच नाही तर हा व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घालत आहे.

Updated: Jan 27, 2023, 05:27 PM IST
Couple Viral Video : प्रेमीयुगुलाची गच्चीवर रासलीला सुरु असताना अचानक आई आली अन् मग... title=
Trending Video Couple Romance on Terrace Video Viral on Social media

Couple Romance on Terrace Viral Video : छत पर सोया था बहनोई में तने समझ के सो गई राणा जी माफ करना गलती मारे से हो गई...हे गाणं आठवतं का? सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'करण अर्जुन' चित्रपटातील ममता कुलकर्णीचं (Mamta Kulkarni) हे गाणं आजही अनेकांना वाजतं.  आता तुम्ही म्हणाल अचानक या गाण्याची आठवण का...तर जर तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिला तर तुम्हालाही हेच गाणं आठवेल. चित्रपटातील दृश्यं या व्हिडीओमध्ये प्रत्यक्षात दिसतंय. आजच्या तरुण पिढीला समाजाची, घरच्यांची कसलीही लाज राहिलेली दिसतं नाही. कसा धाकही उरलेला दिसतं नाही. तरुणांचे अनेक धक्कादायक कृत्यचे प्रकार समोर आले आहेत. पण तरुणीही हद्द केली आहे. 

गच्चीवर रासलीला!

पूर्वी लोक सर्रास गच्चीवर झोपायचे...आजही गावाकडे अनेक लोक गच्चीवर झोपतात. लहान मुलं आणि पुरुष मंडळी गच्चीवर झोपायला जातात. पण हा गच्चीचा व्हिडीओ पाहून धक्काच बसतो. कारण भरदिवसा एका गच्चीवर पांढऱ्या रंगाचा चादरीत एक तरुण झोपला आहे असं दिसतं...तेवढ्यात लाल रंगाची साडी नेसलेली एक महिला गच्चीवर येते आणि त्याला मारायला लागते...हे काय त्या चादरीतून एक तरुणी बाहेर येते. हे पाहून महिलेचा संताप होतो आणि ती त्या तरुणीची धुलाई करते. ( Trending Video Couple Romance on Terrace Video Viral on Social media )

धक्कादायक व्हिडीओ

अरे देवा गच्चीवर तरुण तरुणी चादरीच्या आत रोमान्स करत होते. महिलेने पकडल्यानंतर तरुणीने तिथू पळ काढला. ती तरुण त्या गच्चीवरुन दुसऱ्या गच्चीवर गेली आणि खाली उतरली. हा सगळा प्रकार बाजूच्या गच्चीवरील एक जण कॅमेऱ्यात कैद करतं होतं. दुसरीकडे तो तरुण चादरीच्या आत आपल्या चेहरा लपवत होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gidda company (@gieddee)

व्हिडीओ व्हायरल 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर gieddeeandgiedde या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला एडिट करुन मीम्स पण टाकण्यात आले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल काही स्पष्ट नाही.