Girls Fight Video : गँग्स ऑफ गोरखपूर! रेस्टॉरंटमध्ये झिंज्या उपटून मुलींचा राडा, पण ही भांडणं कशासाठी?

Girls Fight Viral Video : सोशल मीडियावर मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहिला मिळतात. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान व्हूजही मिळतात. मुलींच्या दोन गटांमधील मारामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर यूजर्सचं  (Girls Fight Trending Video) लक्ष वेधून घेत आहे. 

Updated: Feb 25, 2023, 11:16 AM IST
Girls Fight Video : गँग्स ऑफ गोरखपूर!  रेस्टॉरंटमध्ये झिंज्या उपटून मुलींचा राडा, पण ही भांडणं कशासाठी? title=
trending video girls fight on restaurant gorakhpur viral video on social media

Girls Fight Trending Video : मुलांमुलांमधील (girls Video) हाणामारी, राडा ही सर्वसामान्य बाब आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये तरुणी आणि मुलींची अनेक मारामारीच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये  (Mumbai Local train) जागेवरून महिलांचे मारामारीचे (Girls Fight video) अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत.  सध्या सोशल मीडियावर एका रेस्टॉरंटमधील मुलींच्या दोन गटांमधील भांडणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्सला धक्का बसतो आहे. मुलींची अशी मारामारी आपण चित्रपटात पाहिली आहे. खऱ्या आयुष्यात मुलींचा असा राडा पाहून नेटकरी हैराण झाले आहे. (viral video on social media)

रेस्टॉरंटमध्ये झिंज्या उपटून मुलांची राडा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एकमेकींच्या झिंज्या उपटून मारहाण केली जाते आहे. एवढंच नाही तर लाठ्या काठ्यांचा वर्षाव होतानाही दिसतं आहे. एकमेकांना शिवीगाळ करत रेस्टॉरंटमध्ये मुलीचा हा राडा पाहून इतर नागरिक घाबरले आहेत. या व्हिडीओमध्ये एक मुलगी दुसऱ्या मुलीला पायऱ्यांवरून खाली ढकलताना देखील दिसत आहे. त्यानंतर एक मुलगी काठी घेऊन आली आणि मारामारी करायला लागली. तरुणींच्या टोळक्याची अशी मारामारी आपण पहिले कधीच बघितली नसेल. (trending video girls fight on restaurant gorakhpur viral video on social media)

कुठे घडली ही घटना? 

उत्तर प्रदेशातील गोरखपूर (Gorakhpur in Uttar Pradesh) येथील एसएसपी निवासस्थानासमोरील एका रेस्टॉरंटमधील हा व्हिडीओ (Shocking video) आहे. ही घटना गुरुवारी रात्री असल्याचं प्राथमिक माहितीत समोर आली आहे. व्हिडीओमध्ये मुलींचं वय 15 ते 20 वर्षांच्या दरम्यान असल्याचं बोलं जातं आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियकरावरून या दोन गटांमधील मुलींमध्ये हे भांडण झाल्याचं सांगण्यात येतं आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोरखपूर पोलिसांनी या मुलींवर कारवाई केली आहे.