Viral python video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. व्हायरल (viral video) होणारे काही व्हिडीओ फारच मजेशीर असतात, काही व्हिडीओ घाबरवणारे (scarry viral video) असतात तर काही प्राण्यांचे,सापांचे व्हिडीओ असतात. (viral python attacked on woman video viral )
सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातात आणि शेअरसुद्धा केले जातात. लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलंय आणि शेअरसुद्धा केला आहे. (viral snake videos)
साप हा एक असा प्राणी आहे ज्याचं नाव जरी घेतलं तरी आपला थरकाप उडतो, लहान असो व मोठे साप पाहिला तरी पळता भुई कमी पडते चुकून जरी साप आपल्या वाटेत आला तर साप आणि आपण दोघे घाबरतो दोघेही एकमेकांना इजा पोहचवण्याआधी घाबरून काहीतरी पाऊल उचलतात यात साप आपल्याला दंश करतो तर कधी आपण आत्मसंरक्षण म्हणून सापाला मारतो.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ आहे सापाचा. हो पण यात एका सापाने महिलेवर असा काही हल्ला केला कि तिला सुद्धा समजलं सुद्धा नाही. खरतर पिंजऱ्यात या सापाला ठेवण्यात आलं होत. महिला कदाचित केअर टेकर असावी . (dangerous snake video on social media)
पिंजरा साफ करण्याच्या हेतूने तिने पिंजऱ्याचं झाकण उघडलं आणि तोच क्षणार्धात या अजगराने या महिलेचा हात कडाडून पकडला. त्याचा चावा घेतला. सुरवातीला महिलेला वाटलं कि तिची सुटका होईल;
पण अजगराने पकड आणखी घट्ट केली आणि महिला मात्र आता घाबरली ती मदतीसाठी सर्वाना बोलावू लागली पण अजगराच्या ताकदीसमोर तिचा निभाव लागेना. या घटनेचा कोणीतरी व्हिडीओ शूट केला आणि पाहता पाहता हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आतापर्यंत लाखो जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे. (trending viral python attack on woman in cage video viral on social media )