या वर्षी नष्ट होणार जग? नास्त्रेदमसची भविष्यवाणी खरी ठरणार? पाहा नेमकं काय घडणार?..

2022 या वर्षासाठी नास्त्रेदमस (Nostradamus) ने केलेली भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय ठरतेय ,जवळपास 500 वर्षांपूर्वी त्याने हि भविष्यवाणी केली होती. 

Updated: Aug 18, 2022, 06:24 PM IST
या वर्षी नष्ट होणार जग? नास्त्रेदमसची भविष्यवाणी खरी ठरणार? पाहा नेमकं काय घडणार?.. title=

Nostradamus Predictions for 2022: जगातील महान भविष्यवेत्ता नास्त्रेदमस (Nostradamus) ने केलेल्या भविष्यवाणीनमध्ये आतापर्यंत 85% भविष्यवाणी  खऱ्या ठरल्या आहेत. ज्यात हिटलरचं शासन ,दुसरं विश्वयुद्ध ,9/11 चा हमला आणि फ्रांस क्रांती यांचा समावेश आहे . 2022 या वर्षासाठी नास्त्रेदमस (Nostradamus) ने केलेली भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय ठरतेय ,जवळपास 500 वर्षांपूर्वी त्याने हि भविष्यवाणी केली होती. नास्त्रेदमसचा जन्म जर्मनी मध्ये 14 डिसेंबर 1503 मध्ये झाला होता आणि मृत्यू 2 जुलै 1566 मध्ये झाला . 

या वर्षी अण्वस्ञ हल्ला होण्याची भविष्यवाणी 

2022 विषयी आपल्या भविष्यवाणीमध्ये नास्त्रेदमस  (Nostradamus Predictions) सांगितलंय कि यावर्षी अण्वस्ञ हल्ला होण्याची शक्यता आहे आणि हवामानात मोठा बदल होईल आणि  पृथ्वीच्या स्थितीत मोठा बदल होईल.  

हेही वाचा : गोळ्या- डाएट ठेवा बाजूला, आता हे ड्रिंक कमी करणार THYROIDचा त्रास..

महागाई संदर्भातही केली भविष्यवाणी 

नास्त्रेदमस ने 500 वर्षांपूर्वीच महागाईविषयी भविष्यवाणी केलीये. त्याच्या भविष्यवाणीनुसार यावर्षी महागाई उच्चांक गाठेल  मोठी घसरण होईल शिवाय 2022 मध्ये सोने चांदी आणि बिटकॉइनमध्ये बरेच लोक पैसे गुंतवू शकतात. 

लघुग्रहामुळे मोठं नुकसान होईल  

नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीनुसार 2022 मध्ये लघुग्रहामुळे पृथ्वीवर मोठं नुकसान होणार आहे नास्त्रेदमस ने सांगितल्यानुसार एक मोठा खडक समुद्रात पडेल आणि त्यामुळे समुद्रात मोठ्या लाटा येतील आणि संपूर्ण पृथ्वी त्यात बुडून जाईल आणि समुद्राच्या पाण्यामुळे धर्तीवर पृथ्वीवर खूप नुकसान होईल. 

हेही वाचा : Rakesh Jhunjhunwala यांच्यानंतर 'हा' असेल Share Market चा नवा Big Bull!

 

फ्रान्समध्ये वादळ उठेल आणि नुकसान होईल 

नास्त्रेदमसच्या  भविष्यवाणीनुसार फ्रान्समध्ये एक मोठं वादळ येईल. त्यामुळे पृथ्वीवर बऱ्याच भागात आग लागून नुकसान होईल.. 

आर्टिफिशियल इंटेलिजेंस(AI ) मानवावर नियंत्रण ठेवतील 

नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीनुसार साल 2022 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस मानवावर पूर्णपणे नियंत्रण करेल आणि रोबोट मानवजातीला पूर्णपणे नष्ट करून टाकेल.