Rakesh Jhunjhunwala :भारतीय शेअर बाजाराचा(SHARE MARKET) BIG BULL म्हटल्या जाणार्या राकेश झुनझुनवाला(RAKESH JHUNJHUNWALA) यांचं नुकतंच निधन झालं वयाच्या 62व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरतर राकेश झुनझुनवाला यांच्या जाण्यानं शेअर मार्केटमधील एके युगाचा नातं झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही .
राकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केटमध्ये BIG BULL म्हणून ओळखलं जायचं.. कधी जर कोणीही त्यांना मार्केट म्हणजे कायय़ असं विचारलं तर त्यावर त्यांचं उत्तर एकच असे ते म्हणजे ''बाजारात आता मोठी तेजी येणार आहे ''
झुनझुनवाला यांनी त्यांच्या मागे कोट्यवधी करोडोंची संपत्ती सोडली त्यामुळे त्यांच्या जाण्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत जसे कि त्यांचा संपत्तीचा वारसदार कोण असेल? एअरलाइन्सचे अधिकार कोणाकडे जातील ?
राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर भारतीय शेअर बाजाराचा पुढचा बिग बुल (WHO WILL BE NEXT BIG BULL) कोण असेल, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबतीत दूरदूरपर्यंत कोणतेच नाव दिसत नाहीये.
झुनझुनवालांच्या मृत्यूने 'BIG BULL' युग संपले..
'BIG BULL' युगाची सुरुवात हर्षद मेहतापासून झाली आणि झुनझुनवाला यांच्या निधनाने तो काळ संपला असं जाणकार सांगतात
झुनझुनवालाच्या आसपास क्वचितच कोणी राहू शकेल
झुनझुनवाला यांच्या निधनानंतर बाजारात क्वचितच कोणी असेल जो झुनझुनवाला यांची जागा घेण्याची क्षमता ठेवेल असं काही तज्ज्ञ सांगतात.