close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

धावत्या रेल्वेत महिलेला प्रसुतीकळा... रेल्वे टीटीई देवदूत बनून धावला!

रात्रीच्या वेळेस धावत्या रेल्वेत अचानक प्रसव पीडा जाणवू लागल्यानं महिला वेदनेनं कळवळत होती

Updated: Jun 14, 2019, 02:29 PM IST
धावत्या रेल्वेत महिलेला प्रसुतीकळा... रेल्वे टीटीई देवदूत बनून धावला!

नवी दिल्ली : बस किंवा रेल्वे स्टेशनवर डिलिव्हरीच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. परंतु, ही घटना लांब पल्ल्याच्या रेल्वेत घडलीय. रेल्वेच्या दिल्ली विभागात टीटीई (Travelling Ticket Examiner) म्हणून कार्यरत असणाऱ्या एच एस राणा यांनी काही प्रवाशांच्या मदतीनं एका महिलेची प्रसुती पार पाडण्यात मोलाची मदत केलीय. धावत्या रेल्वेत कुणीही डॉक्टर उपलब्ध नसताना एच एस राण यांनीच महिलेला प्रसुतीसाठी मदत केली. राणा यांच्या या मदतीमुळे महिलेची सुखरुप सुटका झालीच परंतु, भारतीय रेल्वेलाही या घटनेची दखल घ्यावी लागली. 

रात्रीच्या वेळेस धावत्या रेल्वेत अचानक प्रसव पीडा जाणवू लागल्यानं महिला वेदनेनं कळवळत होती. यावेळी टीटीई पदावर कार्यरत असणाऱ्या राणा यांनी कुणी डॉक्टर उपलब्ध होऊ शकतो का? हे पाहण्यासाठी धावपळ केली. परंतु, यावेळी कुणीही डॉक्टर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे राणा यांनी स्वत:च या महिलेची प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. 

रेल्वेत हजर असणाऱ्या काही प्रवाशांची मदत घेऊन राणा यांनी महिलेची प्रसुती केली. टीटीई राणा यांनी दाखवलेल्या या माणुसकीचा भारतीय रेल्वेलाही अभिमान आहे. रेल्वे मंत्रालयानं राणा यांच्या या कामाचं सोशल मीडियावरून कौतुक केलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, रेल्वेत डिलिव्हरी होण्याचं हे काही पहिलंच प्रकरण नाही. काही दिवसांपूर्वी जलपाईगुडीमध्ये आगरतळा - हबीबगंज एक्सप्रेसमध्येही एक महिला प्रसुत झाली होती. यावेळी रेल्वेतील प्रवाशांनीच या महिलेला प्रसुती दरम्यान मदत केली होती.