भारताला अमेरिकेची ही ''हळदीची जखम'' भरायला १३ वर्ष लागली...तेव्हा हळद भारताची झाली

हळदीचा आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वापर करतो. हळद ही प्रत्येक भारतीयांच्या  स्वयंपाकघरात आढळते

Updated: Jun 23, 2021, 03:28 PM IST
भारताला अमेरिकेची ही ''हळदीची जखम'' भरायला १३ वर्ष लागली...तेव्हा हळद भारताची झाली

मुंबई : हळदीचा आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वापर करतो. हळद ही प्रत्येक भारतीयांच्या  स्वयंपाकघरात आढळते. हळद ही केवळ मसाल्यातच वापरली जात नाही तर ती प्रभावी औषध देखील आहे. चवीने ही तशी कडू आहे. परंतु हिचे सेवन केल्याने ताप कमी होतो असे देखील लोकांचे मानने आहे. हळदीचे मूळ बरीच औषधे तयार करण्यासाठी वापरले जाते. हळद रक्त शुद्ध करण्यासाठी आणि जखमेला बरे करण्यासाठी वापरली जाते. परंतु हळदीसाठी भारत आणि अमेरिका एकमेकांसमोर उभे राहिले. कारण अमेरिकेचे असे मानने आहे की, हळद ही भारताची नाही.

संपूर्ण प्रकरण काय?

1994 मध्ये यूएस पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसने  (PTO) मिसीसिपी यूनिवर्सिटीच्या दोन संशोधक सुमन दास आणि हरिहर कोहली यांना हळदीच्या अँटिसेप्टिक गुणधर्मांचे पेटंट मंजूर केले गेले. यावर भारतात बरीच खळबळ उडाली होती.

भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद  (CSIR) ने हा खटला लढला. भारताने असा दावा केला की, हळदीचे अँटिसेप्टिक गुणधर्म भारताच्या पारंपारिक ज्ञानात येतात आणि त्यांचा उल्लेख भारताच्या आयुर्वेदिक ग्रंथातही आहे. यानंतर पीटीओने ऑगस्ट 1997 मध्ये दोन्ही संशोधकांचे पेटंट रद्द केले.

सीएसआयआरने अमेरिकेचा दावा मान्य करण्यास नकार दिला होता. सीएसआयआरने म्हटले होते की, गेल्या अनेक शतकांपासून हळदीचा वापर लोकांच्या जखमांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे.

खटला लढण्यासाठी सीएसआयआरने त्यावेळी अमेरिकन वकिलाची नेमणूक केली होती. या केससाठी त्यांनी 15 हजार डॉलर्स खर्च केले. सीएसआयआरने बरीच कागदपत्रे सादर केली होती जी अनेक सायन्स जर्नल आणि पुस्तकांमध्ये प्रकाशित झाली होती.

हळद भारताच्या आयुर्वेदाचा भाग

या सर्व कागदपत्रांमध्ये हळदीही आयुर्वेदाचा एक भाग म्हणून वर्णन केले गेले होते. म्हणजेच हळद भारतीय औषधांचा एक भाग आहे. शास्त्रज्ञांच्या वतीने असे सांगितले जात आहे की, अमेरिकेत प्रथमच अशा गोष्टी घडत आहेत ज्यामध्ये विकसनशील देशाकडून त्याचे पारंपारिक औषध हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमेरिकेने यापूर्वीही अनेक भारतीय उत्पादनांवर आपला हक्क सांगितला होता.

अमेरिकेच्या पराभवाबद्दल सीएसआयआरचे तत्कालीन संचालक रघुनाथ माशाळेकर म्हणाले होते की, पारंपारिक ज्ञानाचे रक्षण करण्याच्या दिशेने या प्रकरणातील यशाचे दूरगामी परिणाम होतील.

ही केस पारंपारिक ज्ञान जपण्याचे महत्त्व दर्शवते. हळदीची लढाई आर्थिक कारणास्तव नव्हे तर देशाच्या अभिमानासाठी लढली गेली आहे. असे ही माशाळेकर म्हणाले.