Tweet by Ram Gopal Varma Shraddha Murder Case: अवघ्या देशाला हादरावून सोडणाऱ्या दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणाची (Shraddha Murder Case) नव नवीन खुलासे समोर आले आहेत. 28 वर्षीय आफताब हा श्रद्धासह (Shraddha Murder Case) दिल्लीत राहात होतो. ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहात होते. पण तो सतत तिला मारहाण करत असे. त्यानंतर तिचा गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी भिरकावून दिले. पण आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. (Tweet by Ram Gopal Varma Shraddha Murder Case nz)
या हत्याकांडानंतर अनेक आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत. या हत्येचे वेगवेगळे पैलू समोर येत आहेत. अनेक लोकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. बॉलीवुड डायरेक्टर राम गोपाल वर्मा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावरील (Social Media) त्यांच्या पोस्ट व्हायरल (Post viral) होत असतात. राम गोपाल वर्मा हे नेहमीच अनेक मुद्द्यांवर आपली मतं मांडत असतात. असंच मत त्यांनी श्रद्धा हत्याकांडावर मांडलेलं आहे.
Brutal murders can’t be prevented just by fear of law ..But they can be definitely stopped if the victims spirits come back from the dead and kill their killers ..I request God to consider this and do the needful
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 16, 2022
या हत्येवर राम गोपाल वर्मा यांनी संताप व्यक्त केला आहे. राम गोपाल वर्मानं ट्वीटमध्ये (Tweet) लिहिलं, श्रद्धाचा आत्मा परत यावा आणि त्याचे 70 तुकडे करावेत असे लिहिले आहे. राम गोपाल वर्मा यांनी या प्रकरणावर आणखी एक ट्विट केले आहे की, अशा हत्या केवळ कायद्याने थांबवता येत नाहीत, पण जर पीडितेचा आत्मा परत आला आणि मारेकऱ्यांना मारले तर नक्कीच थांबवता येईल. देवाने याचा विचार करावा आणि आवश्यक ते करावे ही विनंती.'
Instead of resting in PEACE she should come back as a spirit and cut him into
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 16, 2022
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawala) याला अटक केल्यानंतर सहा महिन्यांनी ही अत्याचारी घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस (Police) अधिकाऱ्यांनी दिली आहे. आफताब पूनावालाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरवर (Live-in partner) लग्नासाठी दबाव टाकण्यासाठी तिची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तुकडे मेहरौलीच्या जंगलात फेकून दिले. अशा स्थितीत आफताबच्या नार्को टेस्टसाठी पोलिसांनीही कायद्याचा आधार घेतला आहे. अद्याप पोलिसांना कोणत्याही प्रकारचा पुरावा मिळालेला नाही.