मुंबई : गणपती बाप्पांच (Ganeshotsav 2022) आगमन उद्या होणार असून सर्वजण घरात डेकोरेशन करत आहेत. डेकोरेशन आकर्षक आणि देखणं होण्यासाठी प्रत्येकजण काहीना काही आयडिया करत असतो. गणपती बसवल्यावर तिथलं वातावरण तेजस्वी राहण्यासाठी गणपतीच्या पुढे सुगंधी धूप, उदबत्ती लावली जाते. मात्र उदबत्तीच्या राखेमुळं तिथलं वस्त्र खराब होतं. त्यामुळे ते रोज बदलाव लागतं. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही.
तुम्हाला आता एक घरगुती ट्रिक सांगणार आहे. यामुळे उदबत्तीच्या राखेमुळं तुमचं डेकोरेशन खराब होणार नाही. यासाठी तुम्हाला एकही रूपया खर्च करावा लागणार नाही.
नक्की काय आहे ट्रिक:
तुमच्या घरात श्रीखंड किंवा आम्रखंंडाचा डब्बा असेलच, तो डब्बा घेऊन त्या डब्ब्याच्या झाकणाला बरोबर मधोमध कटरच्या मदतीने विटेच्या आकाराचा खड्डा पाडा.
त्याच बाजुला उदबत्तीच्या काडीच्या आकाराएवढं होल करा. त्यानंतर डबा पडणार नाही म्हणून काहीतरी वजनदार वस्तु ठेवा. वजनदार वस्तु म्हणजे तुम्ही त्यामध्ये वाळूही ठेवू शकता. तुम्हाला जे सहज उपलब्ध असेल अशी वस्तु ठेवा. जेणेकरून वाऱ्याने किंवा उदबत्तीने डबा पडणार नाही. यासाठी तुम्हाला एकही रूपया खर्च करावा लागणार नाही.