उद्धव ठाकरे यांचा काळा पैसा परदेशात; रवी राणांचा गंभीर आरोप

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी झी 24 तास शी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Updated: Jun 22, 2021, 03:46 PM IST
उद्धव ठाकरे यांचा काळा पैसा परदेशात; रवी राणांचा गंभीर आरोप  title=

नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. जात प्रमाणपत्र प्रकरणी हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. या संदर्भात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी 'झी 24 तास'शी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आमदार रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप
+ उद्धव ठाकरेंचा काळा पैसा परदेशात आहे.
+ हॅाटेल, घर स्वरूपात विदेशात संपत्ती कमावली आहे.
+ माझ्याकडे ठाकरेंच्या काळ्या संपत्तीचे पुरावे आहेत.
+ ईडी आणि सीबीआय कडे पुरावे देणार.
+ आमदार रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल.

उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादाने मला अडकवलं जातंय - नवनीत राणा
+ शिवसेना  महिलेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतेय
+ आनंदराव अडसूळ यांनी पराभव पचवायला पाहीजे
+ उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादानं अडकवलं जातंय
+ मला जाणून बुजून त्रास दिला जातोय

असे गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केले आहे. नवनीत राणा यांचा जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील गंभीर आरोपांपर्यंत आला आहे. याला शिवसेना नेते काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.