आधारकार्ड नसेल तरी मिळणार लस आणि अत्यावश्यक सेवा, UIDAI चे स्पष्टीकरण

आधारकार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे.

Updated: May 16, 2021, 07:42 PM IST
आधारकार्ड नसेल तरी मिळणार लस आणि अत्यावश्यक सेवा, UIDAI चे स्पष्टीकरण title=

मुंबई : यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (Unique Identification Authority of India)कोरोना काळात महत्त्वाच्या सुचना जारी केल्या आहेत. UIDAIम्हणण्यानुसार ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांना वॅक्सिन, औषधं किंवा आत्यावश्याक कामांसाठी नकार दिला जाणार नाही. असं स्पष्टीकरण यूआयडीएआयने (UIDAI) दिले आहे. काही लोकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना लसीकरण आणि इतर आत्यावश्याक कामांसाठी अडथळे येत असल्यामुळे UIDAI हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

कोरोना काळात प्रत्येकाला आवश्यक सुविधा मिळणं फार महत्वाचं आहे, कोणाकडेही आधार उपलब्ध नसेल तरी त्यांना सर्व सुविधा मिळणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरीही कोरोना लस, औषधे आणि रुग्णालयात भरतीही होता येईल. असं UIDAIने सांगितलं आहे. 

आधारकार्ड नसल्यामुळे एखाद्याला आवश्यक वस्तू मिळत नसल्यास किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यास काही अडथळे येत असतील तर  एजन्सी किंवा विभागास आधार अधिनियम, 2016 मध्ये नमूद केलेल्या विशिष्ट निकषानुसार त्याला सेवा द्यावी लागेल. असं देखील UIDAIने सांगितलं आहे. 

आधारकार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे महत्त्वाचे ओळखपत्र आहे.तसेच, 24 ऑक्टोबर 2017 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात असेही जारी करण्यात आले होते, की आधारमुळे कोणाच्याही आवश्यक सेवांवर परिणाम होणार नाही. त्यामुळे कोरोना काळात जरी आधारकार्ड काही कारणांसाठी नसेल, तरी सर्व अत्यावश्यक सेवांचा लाभ घेता येणार आहे.