मंत्र्याचा दिलदारपणा : कोविड वार्डात चक्क पुसतोय फर्शी

एका अदृष्य व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे.

Updated: May 16, 2021, 06:45 PM IST
मंत्र्याचा दिलदारपणा : कोविड वार्डात चक्क पुसतोय फर्शी

मुंबई : संपूर्ण देश कोरोना विषाणूमुळे त्रासला आहे. या एका अदृष्य व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. अनेक दिग्गज मंडळी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. दररोज सोशल मीडियावर कोरोना व्हायरस संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोचं फार कौतुक होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये  एक मंत्री कोविड वार्डात चक्क फर्शी पुसताना दिसत आहे. 

या फोटोमध्ये फर्शी पुसणारे व्यक्ती  मिझोरमचे ऊर्जामंत्री आर लालजिरलैना आहेत. त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याचदरम्यान ते रूग्णालयात फर्शी पुसताना दिसत आहेत. सोशल मीडियावर त्यांचा फोटो पोस्ट होताचं तुफान व्हायरल होच आहे.  त्यांच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेन्ट्सचा पाऊस पडत आहे.