बेरोजगार तरुणांनी सुरु केली SBIची बनावट शाखा

एवढंच नाही तर शाखा चालवण्यासाठी त्यांनी...

Updated: Jul 12, 2020, 10:41 PM IST
बेरोजगार तरुणांनी सुरु केली SBIची बनावट शाखा

नवी दिल्ली : देशातील कोरोना संकटात आत्मनिर्भर होण्याबाबत सांगण्यात येत आहे. सरकारने यासाठी अभियानही सुरु केलं आहे. पण काहींनी असं पाऊल उचलंल की सर्वच जण हैराण झाले आहेत. तमिळनाडू येथील काही लोकांनी मिळून भारतीय स्टेट बँकची खोटी, बनावट शाखाच सुरु केली आहे. एवढंच नाही तर शाखा चालवण्यासाठी बँकेच्या पावत्या, चलान यांसारखी कागदपत्रही त्यांनी छापली. परंतु त्यांना आपल्या शाखेत कोणाचंही खातं सुरु करता आलं नाही. 

तमिळनाडूतील कुड्डालोक जिल्ह्यातील पन्नुत्ति येथे काही लोकांनी मिळून एसबीआयची बनावट शाखा सुरु केली. यापैकी एका आरोपीचे वडील निवृत्त बँक कर्मचारी आहेत. तर एक आरोपी प्रिंटिंग प्रेस चालवतो. येथूनच त्यांनी बँकच्या पावत्या, चलान प्रिंट केलं असल्याची माहिती आहे. तर तिसरा आरोपी प्रिटिंग रबर स्टँपचं काम करतो. एवढंच नाही तर या सर्वांनी मिळून नोटा मोजणाऱ्या मशीनचीही सोय केली होती.

या आरोपींनी 3 महिन्यांपूर्वीच बनावट शाखा सुरु केली होती. परंतु ते या शाखेत कोणतंही खातं सुरु करु शकले नाहीत की, कोणताही व्यवहार होऊ शकला नाही.

पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून आरोपी विरोधात IPC 473, 469, 484 आणि 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.