दुसऱ्या मोदी सरकारचा पहिला निर्णय, शिष्यवृत्तीत वाढ

मोदी सरकारने नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेत कामाला सुरुवात केली.  

Updated: May 31, 2019, 06:21 PM IST
दुसऱ्या मोदी सरकारचा पहिला निर्णय, शिष्यवृत्तीत वाढ title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोठे यश संपादन केल्यानंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी काल शपथ घेतली. आज दुसऱ्या दिवशी केंद्रातील मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी मोदी सरकारने नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेत कामाला सुरुवात केली. या बैठकीत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेतील शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता दोन हजार रुपयांऐवजी अडीच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थित सुरु आहे. दुसऱ्या मोदी सरकारचा पहिला निर्णय झाला. त्यानुसार पीएम शिष्यवृत्ती योजनेतील शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे. याचा लाभ अनेक विद्यर्थ्यांना होणार आहे. पहिल्या बैठकीत १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच संसदेचे अधिवेशन घेण्याबाबत या बैठकीत विचार विनिमय होऊन तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी पार पडला. यानंतर पंतप्रधानांनी श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांची भेट घेतली. हैद्राबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि सिरीसेना यांची भेट झाली. त्याचसोबत मोदींनी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जुगनाथ यांचीही भेट घेतली. भूतान आणि बांग्लादेशाच्या प्रतिनिधींचीदेखील मोदींनी भेट घेतली.