नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यात महिला केंद्रीय मंत्री देखील सुरक्षित नाही. गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. केंद्रीय मंत्री ज्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक असतात. त्यांच्या सोबत देखील छेडछाडीची घटना घडली आहे. केंद्रात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. अनुप्रिया पटेल यांच्यासोबत काही तरुणांनी चुकीच्या पद्धतीने इशारे केले.
तक्रारीनुसार अनुप्रिया पटेल सोमवारी रात्री मिर्जापूर येथून वाराणसीला जात होत्या. केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनुप्रिया पटेल गाडीमध्ये होत्या. त्यादरम्यान नंबर नसलेल्या कारमधून 3 जण त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते. पाठलाग न करण्य़ाच्या सूचना दिल्यानंतर ही सुरक्षा रक्षकांना न घाबरता त्यांनी गाडीचा पाठलाग सुरु ठेवला. अश्लील इशारे करत त्यांनी चुकीचं वर्तन केलं. अनुप्रिया पटेल यांनी याची तक्रार वाराणसीचे एसएसपी आरके भारद्वाज यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याचा अलर्ट दिला आणि तिघांना पोलिसांनी अटक केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पद स्विकारल्यानंतर छेडछाडच्या घटना रोखण्यासाठी अँटी रोमियो स्क्वॉडचं गठन केलं होतं. पण अजून देखील महिलांविरोधातील तक्रारी कमी झालेल्या नाहीत.