देशात आणखी ४२ सीएनजी तर राज्यात नव्याने आठ सीएनजी स्टेशन्स

पर्यावरणपूरक कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची व्यापकता वाढविण्यात येत आहे. यासाठी देशात आणखी ४२ सीएनजी आणि टोरेंट गॅसचे तीन सिटी गेट स्टेशन्सचे लोकार्पण करण्यात आले आहे. 

Updated: Oct 6, 2020, 08:55 PM IST
 देशात आणखी ४२ सीएनजी तर राज्यात नव्याने आठ सीएनजी स्टेशन्स  title=
Pic Courtesy : twitter

नवी दिल्ली : पर्यावरणपूरक कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) ची व्यापकता वाढविण्यात येत आहे. यासाठी देशात आणखी ४२ सीएनजी ( CNG stations) आणि टोरेंट गॅसचे तीन सिटी गेट स्टेशन्सचे लोकार्पण करण्यात आले आहे. यात महाराष्ट्राच्या वाट्याला ८ सीएनजी स्टेशन्स आली आहेत.

केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस व पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयोजित कार्यक्रमात व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सर्व ४२ सीएनजी आणि ३ सिटी गेट स्टेशन्स जोडली. या कार्यक्रमात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि देशभरातील वितरक ज्यांना सीएनजी आणि सिटी गॅस स्टेशन प्राप्त झालेली आहेत ते उपस्थित होते.

सात राज्य, १ केंद्र शासित प्रदेशातील एकूण ३२ जिल्ह्यांमध्ये टोरेंट गॅसला सिटी गॅस वितरण नेटवर्क उभरण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची व्यापकता वाढविण्याच्या उद्देशाने देशभर ४२ सीएनजी आणि टोरेंट गॅसचे ३ सिटी गेट स्टेशन्सचे लोकार्पण करण्यात आले. यापैकी ८ महाराष्ट्रामध्ये आहेत. 

आज जोडलेल्या ४२ सीएनजी स्टेशन्समध्ये १४ उत्तरप्रदेश, ८ महाराष्ट्र, ६ गुजरात, ४ पंजाब आणि ५-५ तेलंगाणा आणि राजस्थान येथे आहेत. सात राज्य, १ केंद्र शासित प्रदेशातील एकूण ३२ जिल्ह्यांमध्ये टोरेंट गॅसला सिटी गॅस वितरण नेटवर्क उभरण्याचे अधिकार असणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये एक-एक सिटी स्टेशन आहे.