नवी दिल्ली : लखनऊच्या सीजेएम न्यायालयाने उत्तर प्रदेशातील उन्नव सामुहिक बलात्कार प्रकरणात भारतीय जनता पक्षाचा (भाजप) आमदार कुलदीप सिंह सेंगर याला सात दिवसांच्या सीबीआय कोठडी ( रिमांड) देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोपी आमदार सेंगरला न्यायालयासमोर शनिवारी हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने हा निर्णय दिला.
दरम्यान, न्यायालयासमोर हजर केले जात असताना सेंगर अंत्यत भांबाऊन गेला होता. जवळपास त्यांचा चेहरा रडकुंडीलाच आला होता. आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचा सेंगर यांनी दावा केला. मात्र, न्यायालयापुढे हजर होताना सेंगर यांने जवळपास तीन वेळा परमेश्वराचा धावा केला. अत्यंत रडवेल्या चेहऱ्याने आणि त्याच आवाजात तो म्हणाला, माझा परमेश्वरावर विश्वास आहे, माझा परमेश्वरावर विश्वास आहे, माझा परमेश्वरावर विश्वास आहे. आरोपी कुलदीप सिंह सेंगर यांना CJM सुनील कुमार यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात होते.
अलाहबाद उच्च न्ययालयाने ताशेरे ओढल्यावर आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगर सीबाआयने अटक केली. पहाटे-पहाटे साडे चार वाजता सीबीआयने सेंगरला इंदिरा नगर येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. सेंगरवर पास्को कायद्यातील मोठ्या कलमांसह बलात्कार, हत्या आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी आमदाराविरूद्ध कारवाई केली जावी आणि आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी पीडित युवतीने कुटुंबियांसमवेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनात यांच्या निवासस्थानासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रसारमाध्यमातून हे प्रकरण जोरदार चर्चीले जात असल्यामुळे भाजप आणि योगी सरकार बॅकफुटला गेले आहे. या प्रकरणात प्रसारमाध्यमे, विरोधक तसेच, देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मंडळींनी सरकारवर टीकेची झोड उडवली आहे.