Shahjahanpur Accident : उत्तर प्रदेशातच्या (UP News) शहाजहांपुरमध्ये (Shahjahanpur) शनिवारी भीषण अपघात (Accident News) घडलाय. प्रवाशांनी भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली पुलावरुन खाली कोसळल्याने मोठा अपघात झाला. एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार या अपघातात आतापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर 31 लोक जखमी झाले आहेत. 40 पेक्षा अधिक प्रवासी या ट्रॉलीमधून प्रवास करत होते. त्याचवेळी हा अपघात झाला आणि ट्रॉली थेट पुलावरुन खाली कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह शहाजहांपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
या अपघातात महिला आणि लहान मुलांसह सुमारे सहा लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या ट्रॉलीमधून प्रवास करणारे सर्व भाविक गररा नदीत पाणी भरण्यासाठी आले होते. तिल्हार पोलीस ठाण्याच्या बिरसिंगपूर गावाजवळ ही धक्कादायक घडली आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. शहाजहांपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. शाहजहांपूरमधील या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.
Shahjahanpur, UP | Over a dozen people are feared dead & many injured after a tractor trolley falls from a bridge into Garra river in Tilhar's Birsinghpur village. Rescue operation is underway. pic.twitter.com/fauJBcOqYA
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 15, 2023
नेमकं काय घडलं?
अजमतपूर गावात आयोजित भागवत कथेसाठी लोक शनिवारी दुपारी गररा नदीतून दोन ट्रॉलीने पाणी घेण्यासाठी गेले होते. पाणी भरल्यानंतर सर्वजण गावाकडे निघाले हो. दोन्ही ट्रॉली पुढे जाण्यासाठी वेगात जात होत्या. आळीपाळीने दोन्ही ट्रॉलीचालक एकमेकांना मागे टाकत होते. मात्र एका ट्रॉली चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती पुलावरून खाली पडली. या ट्रॉलीमध्ये सुमारे 42 लोक होते. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 31 जण गंभीर जखमी झाले आहेत.
थाना क्षेत्र तिलहर में पुल से ट्रैक्टर ट्राली गिरने की दुर्घटना के सम्बन्ध में एस0 आनन्द वरिष्ठ पुलिसअधीक्षक #shahjahanpurpol की बाइट। #UPPolice @Uppolice @112UttarPradesh @UPGovt @homeupgov @uptrafficpolice pic.twitter.com/SEXB9B1nYs
— SHAHJAHANPUR POLICE (@shahjahanpurpol) April 15, 2023
मृतांना दोन लाखांची मदत जाहीर
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाहजहानपूर घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.