लखनऊत दोन संशयित दहशतवाद्यांना अटक; भाजपचे मोठे नेते निशाण्यावर

उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने लखनऊच्या काकोरी परिसरात अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे

Updated: Jul 11, 2021, 03:50 PM IST
लखनऊत दोन संशयित दहशतवाद्यांना अटक; भाजपचे मोठे नेते निशाण्यावर title=

लखनऊ : उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने लखनऊच्या काकोरी परिसरात अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्या निशाण्यावर भाजपचे मोठे नेते असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काकोरी परिसरात चौकशी अभियान
सूत्रांच्या मते, उत्तरप्रदेश एटीएसच्या टीमने ठाकुरगंज परिसरात दोन घरांमध्ये शोध अभियान राबवले. युपी एटीएससोबतच लोकल पोलीस सुद्धा या शोध अभियानात मदत करीत होती. 

युपी एटीएसने काकोरी येथे राहणाऱ्या शाहिदच्या घरी छापेमारी केली आहे. साधारण 8 वर्षापूर्वी तो दुबईवरून परत आला होता. सध्या गॅरेजमध्ये काम करीत होता. त्याच्याकडे स्फोटकं, दोन प्रेशर कुकर आणि अन्य संशयास्पद सामान मिळाला आहे.

दोन संशयितांना घेतले ताब्यात

युपी एटीएसने शाहिदला अटक केली आहे. सोबतच संशयितालाही अटक केली आहे. त्याच्या नावाचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांच्या मते, दहशतवादी साखळी बॉम्बब्लास्ट करण्याच्या नियोजनात होते. एटीएसची टीम दोन्ही संशयितांच्या नेटवर्कचा शोध घेत आहे.

सूत्रांच्या मते, दोन्ही संशयित अल कायदा या संघटनेचे दहशतवादी आहेत. त्यांना उमर अल मंदी नावाचा कंन्ट्रोलर हॅंडल करीत होता. 

दरम्यान, एटीएसला शंका आहे की, आणखी दहशतवादी या परिसरात असू शकतील. दहशतवाद्यांच्या अटकेनंतर जम्मू- काश्मीरच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही युपी पोलिसांशी संपर्क केला आहे. तसेच घटनेची माहिती घेतली आहे.