बड्या कंपनीतील HR मॅनेजरला चैन चोरताना अटक; कारण वाचून माराल डोक्यावर हात

Crime News : अनेक आरोपी बेरोजगारीमुळे आपल्या गरजा भागवण्यासाठी चोरीचा मार्ग स्विकारतात. मात्र काही जण त्यांच्या  पगारावर समाधानी नसता. काही जण दुसरी नोकरी शोधतात तर काही जण वेगळा पर्याय स्विकारतात. मात्र आग्रा येथील एक एचआर मॅनेजर गरजा भागवण्यासाठी थेट सोनसाखळी चोर बनला आहे.

Updated: Mar 12, 2023, 12:49 PM IST
बड्या कंपनीतील HR मॅनेजरला चैन चोरताना अटक; कारण वाचून माराल डोक्यावर हात  title=

Crime News : सोनसाखळी चोरीच्या (chain snatching) घटना या काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. सराईत गुन्हेगार पोलिसांच्या (Police) धाकानंतरही सर्रासपणे चोरी करत आहेत. मात्र उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आग्र्यातून (Agra) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवसायाने एचआर मॅनेजर (HR) असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आपल्या आवडी निवडी आणि हौस पूर्ण करण्यासाठी हा एचआर मॅनेजर सोनसाखळी चोरी करायचा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी आरोपींकडून दुचाकी, लुटलेली सोनसाखळी, पिस्तूल आणि जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत.

एचआर मॅनेजर असलेल्या या आरोपीचे नाव अभिषेक ओझा असल्याचे समोर आले आहे. आरोपी आपली हौस पूर्ण करण्यासाठी चेन स्नॅचिंग करायचा. संधी पाहून तो दुचाकीवरून कोणत्याही महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळून जायचा. आरोपी बऱ्याच दिवसांपासून अशा घटना करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे शहरात अनेक दिवसांपासून चेन स्नॅचिंग आणि मोबाईल लूटण्याच्या घटनांच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत होते मात्र, त्याला यश मिळत नव्हते. या आरोपीची कोणतीही माहिती पोलिसांकडे नव्हती. त्यामुळे त्याला पकडण्यात अपयश येत होते. अगदी सराईतपणे हा चोरी करुन पळून जायचा. मात्र शुक्रवारी पोलिसांनी या आरोपीला पकडण्यात यश आले.

आरोपीने केले धक्कादायक खुलासे

आग्रा पोलिसांनी अभिषेक ओझाला अटक केल्यानंतर त्याने पूर्ण कहाणी सांगितली आहे. चोरीनंतर एका ज्वेलरी दुकानात चोरलेली चैन विकायचा. पिस्तुलाचा धाक दाखवून त्याने अनेकवेळा महिलांच्या चैन लुटल्याचे त्याने सांगितले. आरोपीविरुद्ध न्यू आग्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो ज्या कंपनीत काम करत होता तेथे त्याचा पगार 45 हजार रुपये होता. पण एैशोआरामासाठी तो गुन्हेगार बनला.

आरोपी अभिषेक हा उच्चभ्रू कुटुंबातील असून त्याचे वडील सत्यनारायण ओझा पंजाबमधील एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. कोरोनामुळे आरोपीचे वर्क फ्रॉम होम सुरु होते. त्यामुळे तो आग्रा येथे राहायचा आणि संधी मिळताच बाईकवरुन सोनसाखळी चोरायचा आणि घरी परतायचा. यानंतर ती चेन सोनू वर्मा नावाच्या सोनाराला विकायचा.

आरोपीने तारखेसह अनेक गुन्ह्याच्या घटनाही सांगितल्या आहेत. अभिषेकने पोलिसांना सांगितले की, गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी भाजी घेण्यासाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली होती. तसेच 7 मार्च रोजी नागला हवेली परिसरात दूध घेण्यासाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून नेली होती. याशिवाय सिकंदरा आणि कमला नगर भागातही आपण लूटमार केल्याचेही त्याने सांगितले होते.