दीराचं अपहरण करून खंडणीत मागितली नवरी! पोलिसांनी असा लावला छडा

Lover Kidnapped Brother Of Groom: उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातून अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्ह्याची उकल करणारे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. 

Updated: Nov 11, 2022, 10:01 PM IST
दीराचं अपहरण करून खंडणीत मागितली नवरी! पोलिसांनी असा लावला छडा title=

Lover Kidnapped Brother Of Groom: उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातून अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्ह्याची उकल करणारे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. प्रियकराने प्रेयसीच्या लग्न दुसऱ्यासोबत झाल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं उघड झालं आहे. प्रियकराने प्रेयसीच्या दीराचं अपहरण केलं आणि खंडणीत प्रेयसीला मागितलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि कुटुंबियांनी ललितपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी प्रियकर गोलूचं तिच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. एका नातेवाईकाच्या लग्नात एकमेकांना पाहिलं आणि प्रेम प्रकरण सुरु झालं. दोघं फोन तासंतास बोलायचे. पण अचानक दोघांमध्ये बिनसलं आणि पुढे तिने प्रियकराचा मामेभाऊ उमेशसोबत संवाद सुरु केला. बोलता बोलता जवळीक निर्माण झाली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दोघांनी आपल्या घरी सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी लग्नाला होकार दिला. दोन महिन्यातच लग्नाची तारीख ठरली आणि सोहळा पार पडला. यामुळे प्रियकर गोलूला राग अनावर झाला. आपल्या प्रेयसीला परत मिळण्याासाठी कट रचला. त्याने नवरीच्या दीराचं म्हणजेच मामेभाऊ शालूचं अपहरण केलं. तसेच खंडणीत प्रेमीकाची मागणी केली. 

Sankrit Language: कॅब ड्रायव्हरचा संस्कृतमध्ये संवाद, भाषेवरील प्रभुत्व पाहून तुम्हीही व्हाल आवाक्

7 नोव्हेंबर रोजी उमेश कुटुंबासह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेला असता त्याने पोलीसांना संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गोलूच्या दोन साथीदारांना पकडले आणि शालूला सुखरूप बाहेर काढले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांनी कारागृहात रवानगी केली आहे. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर मुख्य आरोपी प्रेमी गोलूने आत्मसमर्पण केले. पोलिसांनी प्रियकर गोलूला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.