उत्तर प्रदेश : एमआयएमचे (AMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) ओवैसी यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे.
दोन लोकांनी त्यांच्या ताफ्यावर गोळ्या झाडल्या. फायरींगमध्ये गाडीचं टायर पंक्चर झाल्याची माहिती आहे. सुदैवाने ओवैसी यांना कोणतीही इजा झालेली नाही.
विधानसभा निवडणुकीनिमित्ताने ओवैसी उत्तर प्रदेशमध्ये होते. आज प्रचारानंतर ते मेरठवरुन दिल्लीला परतत असताना त्यांच्या ताफ्यावर अचानक दोन लोकांना गोळीबार केला. एकूण चार राऊंड फायर करण्यात आले.
मेरठ इथली प्रचारसभा आटपून परतत असताना टोलनाक्यावर गोळीबार झाल्याची माहिती स्वत: ओवैसी यांनी दिली आहे. छिजारसी टोल नाक्यावर आपल्या ताफ्यावर गोळीबार झाला, ४ राऊंड फायर झाले, ३ ते ४ लोक होते, शस्त्र तिथेच टाकून हल्लेखोर पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो, मी सुरक्षित आहे, असं ट्विट ओवैसी यांनी केलं आहे.
कुछ देर पहले छिजारसी टोल गेट पर मेरी गाड़ी पर गोलियाँ चलाई गयी। 4 राउंड फ़ायर हुए। 3-4 लोग थे, सब के सब भाग गए और हथियार वहीं छोड़ गए। मेरी गाड़ी पंक्चर हो गयी, लेकिन मैं दूसरी गाड़ी में बैठ कर वहाँ से निकल गया। हम सब महफ़ूज़ हैं। अलहमदु’लिलाह। pic.twitter.com/Q55qJbYRih
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 3, 2022