Desi Jugaad: बस ड्रायव्हरने काच साफ करण्यासाठी केला असा जुगाड, नेटीझन्स म्हणाले...

सोशल मीडिया म्हंटलं व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ. या व्यासपीठावर एकापेक्षा एक सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. देसी जुगाड असलेल्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळाते. कारण देसी जुगाड वापरत अडचण दूर करून आश्चर्याचा धक्का दिला जातो. 

Updated: Oct 12, 2022, 01:19 PM IST
Desi Jugaad: बस ड्रायव्हरने काच साफ करण्यासाठी केला असा जुगाड, नेटीझन्स म्हणाले... title=

Desi Jugaad Video: सोशल मीडिया म्हंटलं व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ. या व्यासपीठावर एकापेक्षा एक सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. देसी जुगाड असलेल्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळाते. कारण देसी जुगाड वापरत अडचण दूर करून आश्चर्याचा धक्का दिला जातो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सार्वजनिक वाहनांमधून वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सीट, खिडक्यांशिवाय बसची अवस्था खिळखिळी झालेली असते. काही बसमध्ये ड्रायव्हरला बसायला सीटही तुटलेली असते. सार्वजनिक वाहतूक सेवेची दूरवस्था दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. अशीच काही स्थिती उत्तर प्रदेशमधील बसेसची झालेली आहे. या बसचा वायपर व्यवस्थित नसल्याने ड्रायव्हरने देशी जुगाड (Desi Jugaad Video) वापरल्याचं दिसत आहे.  

मेरठ रोडवेज बसच्या विंड शील्डवर वायपरसाठी जुगाड करण्यात आला आहे. ड्रायव्हरने पाण्याने भरलेली बाटली एका धाग्यात लटकवली आणि दुसऱ्या बाजूला वायपरमध्ये अडकवली. दुसरा धागा वापरला बांधून आतून खेचण्याची तरतूद केली. वायपर आतल्या बाजूने खेचल्यानंतर पाण्यानं भरलेली बाटली पुन्हा वायपर जागेवर आणतो. जेव्हा जेव्हा वायपरची आवश्यकता असते तेव्हा ड्रायव्हर तो धागा स्वतःकडे खेचतो आणि काच स्वच्छ करतो.

हा व्हिडीओ पाहून इंजिनीअरही हैराण झाले आहेत. या देसी जुगाड व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. @Gulzar_sahab नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत 12 हजारांहून अधिक लोकांनी हा पाहिला आहे आणि शेकडो लोकांनी लाइक केला आहे.