close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अजगराचा तमाशा दाखवता दाखवता 'तो'च तमाशा बनला

उत्तर प्रदेशातील माऊ जनपदच्या मोहम्मदाबाद कोतवाली बाजार क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडलीय. 

Updated: Mar 22, 2018, 03:39 PM IST
अजगराचा तमाशा दाखवता दाखवता 'तो'च तमाशा बनला

मऊ : उत्तर प्रदेशातील माऊ जनपदच्या मोहम्मदाबाद कोतवाली बाजार क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडलीय. 

लोकांना जिवंत प्राण्याचा - अजगराचा तमाशा दाखवता दाखवता एका गारुड्याला अजगरानं पकडलं... लोकांना वाटलं की हा गारुडी खेळच करतोय... तो संकटात आहे, याची जाणीवच न झाल्यानं ते केवळ या घटनेचा व्हिडिओ काढत राहिले.

त्याचं झालं असं की, गारुड्यानं अजगराला आपल्या गळ्याला गुंडाळलं होतं... आणि अजगरानं आपली वेटोळ्यातली पकड मजबूत केली... त्याचा गारुड्याच्या गळ्याला पीळ बसला. खूप प्रयत्न केला तरी त्याला अजगराचा पीळ सोडवता येईना. 

पाहता पाहता गारुडी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला... तेव्हाही अजगर त्याच्या गळ्याला मिठी मारून बसला होता. सुदैवानं गर्दीत उभ्या असलेल्या एकाला या घटनेचा अंदाजा आला... त्यानं गारुड्याच्या तोंडावर पाणी टाकून त्याला जागं करण्याचा प्रयत्न केला... पण तो शुद्धीत आला नाही. त्यानंतर लोकांनी १०८ क्रमांकावर फोन करून अॅम्ब्युलन्स मागवली आणि गारुड्याला तातडीन रुग्णालयात हलवलं.

हा गारुडी कोण होता त्याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही. परंतु, त्याला डॉक्टरांनी उपचारासाठी वाराणसीला हलवल्याचं समजतंय.